पुणे :- (प्रमोद तरळ) संत कबीर व राजर्षी शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती दिनानिमित्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.) पुणे जिल्हा कमिटी व आम्ही भारतीय सोशल फाऊंडेशन बेल्हे या
संस्थेच्या वतीने आयोजित केलेले राज्यस्तरीय ग्रामीण कवीसंमेलन अतिशय जल्लोषात संपन्न झाले. यावेळी कविसंमेलनाचे अध्यक्ष मा.डॉ. ख.रा.माळवे यांनी आपल्या ओघवत्या भाषेत कवी व कवयित्री यांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले. खरतरं कविता म्हणजे मनातील भावनांचा गर्भकोष होय..
एखाद्या नव काव्याची निर्मिती करताना मनात ती व्यापक कल्पना सूचायला हवी… नेत्रदीपक सौंदर्य,कल्पकता त्यातूनच परिवर्तनशील नवं कवितेचा जन्म होत असतो. त्यामुळे आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील वास्तव परिस्थितीचे दर्शन घडायला हवे, तर विविध समश्या तर महामानवांच्या कार्यप्रणालीवर आपले प्रभावशाली काव्य निर्मिती होणे आवश्यक आहे.
आज सोशल मिडियाच्या माध्यमातून कवीना त्वरित प्रसिद्धी मिळत असते… परंतु सामाजिक परिवर्तनशील कविताची निर्मिती होणे आवश्यक आहे.
ग्रामीण राज्यस्तरीय कविसंमेलनामध्ये सर्वच कवीनी आपल्या उत्तम व दमदार काव्य रचना सादरीकरण करून उपस्थित साहित्यिकांची मने जिंकली. सहभागी कवीना आकर्षक सन्मान चिन्ह, गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर कविसंमेलनाध्यक्ष मा.डॉ. ख.रा.माळवे यांचे यावेळी आयोजक मा.मनोज जाधव सर, मा.भावना खोब्रागडे, स्वागताध्यक्ष मा.शब्दस्वरा मगरूळकर, मा.अल्पेश सोनवणे, मा.जयद्रथ आखाडे, प्रा.सतिश शिंदे, मा.प्रतिमा काळे, मा.शितल भगत यांच्याउपस्थितीत मा.डॉ. म.रा.माळवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दखल न्यूज महाराष्ट्र