रत्नागिरी : दावते इस्लामी शाखा रत्नागिरी तर्फे 78वा भारतीय स्वतंत्रदिन मद्रसा फैजाने अत्तार येथे ठीक सकाळी 9वाजता उत्साहात साजरा करण्यात आला .या वेळी प्रमुख पाहूणे माजी नगरसेवक सुदेश मयेकर उपस्थित होते.या वेळी माजी नगरसेवक सुदेश मयेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण नंतर सर्वांना जिलेबी तसेच समोसे चे वाटप करण्यात आले. या दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे मौलाना अल्ताफ कुरेशी,तसेच उवेस जरीवाला,फारूक जरीवाला,अली असगर अत्तारी,अकील मेमन, साजिद मेमन तसेच इतर सदस्य,माजी नगरसेवक सुदेश मयेकर साहेब,मुसा काझी तसेच कोकणनगर परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र