प्रतिनिधी: ( लांजा )सुमारे दीडशे वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारत देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले, हा क्षण प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस. आज ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्पना कॉलेज लांजा मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
फॅशन डिझायनिंग च्या विद्यार्थीनींसाठी ड्रेपिंग आणि फॅशन शो तर हॉटेल मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांसाठी स्वीट कॉम्पिटिशन चे आयोजन करण्यात आले होते.
विविध राज्यातील जसे की महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश, गुजरात, काश्मीर, केरळ, प. बंगाल येथील स्त्रियांच्या पारंपारिक पोशाखाला नाविन्यपूर्ण अवतारात सादर करत फॅशन डिझायनिंग च्या विद्यार्थिनींनी भारतीय विविधतेची एक वेगळी ओळख करून दिली.
तर भारतीय राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा वापर करून हॉटेल मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांनी दुधापासून विविध गोड पदार्थ बनवून सादर केले. या मध्ये प्रथम वर्ष हॉटेल मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. स्मितल कांबळे, द्वितीय क्रमांक कु. भरत मुळे आणि तृतीय क्रमांक कु. कुणाल गुरव यांनी पटकावले.
नर्सिंग विद्यार्थिनींनी देशभक्ती पर गाण्यावर नृत्य आणि गाणी सादर केली.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा. मंगेश चव्हाण, प्राचार्य विकी पवार, प्रा. प्रीतम तेंडुलकर, प्रा. धनश्री बंडबे, प्रा. कामिनी आयरे, प्रा. अब्जा वणू उपस्थित होते.