महिला भगिनीं प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर; महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठक- फंशन सेलिब्रेशन हाँल गडचिरोली येथे संपन्न..
दि.१६ ऑगस्ट २०२४
गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोली महिला मोर्चाची जिल्हा कार्यकारणी बैठक फंशन सेलिब्रेशन हॉल चामोर्शी रोड, गडचिरोली या ठिकाणी आयोजीत बैठकीला महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण महत्वाकांक्षी योजना असून याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा महिला ही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे.महिला भगिनींना सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन महिलासाठी अनेक योजना कार्यान्वित करून महिलांच्या पाठीशी आहे.असे उदगार माजी खासदार अशोकजी नेते यांनी उद्घाटनप्रसंगी बोलतांना केले.
यावेळी मंचावर प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे, ज्येष्ठ नेते तथा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी तिडके, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस रेखाताई डोळस, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ गीता ताई हिंगे,डॉ. चंदाताई कोडवते,ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,जिल्हा सचिव रंजीताताई कोडापे,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके,शहराध्यक्ष कविताताई उरकुडे,भाजपा नेत्या तथा नगरसेविका रोशनीताई वरघंटे, व महिला मोर्चा जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमेला व भारतरत्न,माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीदिनी विनम्र आदरांजली वाहून दीप प्रज्वलन करण्यात आले. या महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी बैठकीला उद्घाटक म्हणून माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना महिला भगिनीं प्रत्येक क्षेत्रात समोर येण्यासाठी व महिलांची प्रगती व्हावी यासाठी खऱ्या अर्थाने केंद्र व राज्य सरकार महिलाच्या विकासासाठी कटिबद्ध असून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, सुकन्या समृद्धी योजना,जननी सुरक्षा योजना,प्रधानमंत्री मातृवंदना योजना,उज्वला गॅस अशा अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण व सक्षम करणे गरजेचे आहे.भाजपा मध्ये महिला शक्ती ही सुद्धा अतिशय महत्वाची आघाडी आहे.महिला शक्ती ही मोठी शक्ती असून महिलांचा सहभाग देशातील राजकारणात निर्णय ठरत आहे यासाठी महिलांना खऱ्या अर्थाने सबल व सक्षम करण्याचे महान कार्य मोदीजी नी केले आहे. रामायण,महाभारत हे सुद्धा महिलांमुळे जरि घडले असेल तरि महिला भगिनींनी वादविवाद, हेवे दावे न करता एकजुटीने, एकदिलाने संघटनेचे काम करावे. असे प्रतिपादन माजी खासदार अशोकजी नेते यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
या बैठकी दरम्यान मा. खा. अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे तसेच महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कार्यकर्तुत्वावर विश्वास ठेवून अनेक महिलांनी भाजपा दुपट्टा टाकून शहरातील अनेक महिला भगिनींनी भाजपात पक्षप्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे भाजपा महिला आघाडीची फळी मजबूत झाली असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरिता यांचा निश्चित फायदा होईल.असा विश्वास मंचावरिल मान्यवरांनी केला.