लांजा – गेली अनेक वर्षे भजन कलेशी एकरूप होऊन वडिल सुप्रसिद्ध भजनकार कै.जनार्दन सुर्वे यांच्या पावलावर पाऊल ठेवून तसेच काका ज्येष्ठ भजनी बुवां प्रकाश सुर्वे व अशोक बुवा सुर्वे यांच्या पाठीमागे त्यांचा वारसा चालवून अनेक भजन स्पर्धेत अव्वल मानांकन मिळवले .भजन, डबलबारी क्षेत्रात तर संपूर्ण कोकणभर, ते मुंबईपर्यंत अनेक नामव़ंत भजनी बुवा बरोबर डबल बारी सामने करून आपल्या भडे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला व सुर्वे घराण्याचं नाव शिखरावर पोहोचले. हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया हे यश माझं एकट्याचं नसून माझ्या आई बाबांची पुण्याई व गुरूमाऊली विजय बुवा परब यांच्या शुभर्शीवादाने शक्य झालं, तसेच माझ्या भजनभमंडळाचाही यात सिंहांचा वाटा आहे. असे असूनही माझे पाय कायम जमिनीवर आहेत असे त्यांचे स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून स्वागत आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.