बातम्या

पेण आगारात उत्कृष्ट चालक वाहकांचा सत्कार..

पेण आगार नेहमीच रायगड विभागातील एक महत्त्वाचा आगार म्हणून भूषविला जातो. चालक वाहक नेहमीच उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करित असतात. तसेच पेण आगाराचा पसारा देखील भरपूर मोठा आहे. लांब पल्ला मध्यम लांब पल्ला तसेच तालुक्यातील खेड्या पाड्यात आगारामार्फत ग्रामीण मार्ग चालविले जातात. याच पेण आगारातील चालक वाहकांना उत्तमोत्तम कामगिरी बजावण्यासाठी प्रेरणा मिळावी व सेवेत अधिकाधिक सुधार व्हावेत या हेतूने रायगड एसटी प्रेमी ग्रुप तर्फे उत्कृष्ट चालक व उत्कृष्ट वाहक अशी महत्वाकांक्षी स्पर्धा माहे जुलै २०२४ मध्ये राबविण्यात आली. या स्पर्धेत माहे जुलै २०२४ मध्ये उत्तम कामगिरी बजावून उत्कृष्ट उत्पन्न आणणारे वाहक श्री विशाल भोईर यांनी प्रथम तर श्रीमती प्रियांका घार्गे यांनी द्वितीय क्रमांक. मिळवला, तर श्रीमती भक्ती म्हात्रे व श्रीमती रेश्मा म्हात्रे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

तसेच वाहन चालविण्याचे उत्तम कौशल्य दाखवून कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त किमी चालवून उत्कृष्ट चालक म्हणून श्री मोहन कांदे यांनी प्रथम तर द्वितीय क्रमांक श्री विनोद म्हात्रे तर तृतीय क्रमांक श्री गोविंद गोविंद मुचवाड यांनी पटकावला. तसेच आणखी उत्तेजनार्थ कामगारांचा देखील सत्कार करण्यात आला. पेण आगारात एकूण ५८ बसेस असून त्यापैकी ५५ बसेस सी एन जी इंधन प्रणालीवर चालत असून ३ बसेस या डिझेल इंधनावर चालविण्यात येत आहेत. आगारात बसेस कमी असून देखील आगार व्यवस्थापिका श्रीमती अपर्णा वर्तक व कर्मचारी वृंद एसटी चा उत्पन्न वाढीसाठी व तालुक्यातील लोकांना उत्तम सुविधा मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. प्रसंगी पेण आगाराच्या आगार व्यवस्थापिका श्रीमती अपर्णा वर्तक, वाहतूक निरीक्षक आलोक गायकवाड व कार्यशाळा अधीक्षक अनिल पाटील उपस्थित होते तसेच, रायगड एसटी प्रेमी ग्रुपचे श्री कौस्तुभ मोकल, श्री सिद्धार्थ खंडेराव, श्री ओमकार म्हात्रे, श्री प्रथमेश वर्तक. तसेच MSRTC Lovers Group चे श्री मयुरेश खरात व श्री ललित भोजने उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!