रत्नागिरी : गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन तर्फे दिनांक 18 ऑगस्ट रोजी कोकण नगर नायब नगर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते .या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे किरण सामंत साहेब तसेच माजी नगरसेवक मुसा काझी , केतन शेट्ये, फैसल मुल्ला उपस्थित होते हे रक्तदान शिबिर सकाळी. ठीक 10 दहा वाजता कुराण पठण तसेच दुवा करून सुरुवात करण्यात आली.
या शिबिराचा मूळ उद्देश थॅलेसेमिया या आजारासाठी तसेच इतर गरजू रुग्णांना आवश्यकतेवेळी रक्ताचा उपयोग होईल यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये माननीय किरण सामंत साहेब यांनी भेट देऊन गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले तसेच शिबिर कशाप्रकारे पार पाडणार आहे या संदर्भात विचारपूस केली का शिबिरामध्ये तब्बल 126 जणांनी रक्तदान केले तसेच शिबिर पार पाडण्यासाठी रेड क्रॉस सोसायटी रत्नागिरी यांनी उत्कृष्ट प्रतिसाद व चांगली सेवा दिली. शिबिरासाठी गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचे रत्नागिरीचे अध्यक्ष फारुख जरीवाला तसेच त्यांचे इतर कार्यकर्ते इसाक मेमन, साजिद मेमन, अकिल मेमन, अमजद अत्तारी उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र.