“आम्ही शिवभक्त परिवार, महाराष्ट्र” आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय,ठाणे यांच्यातर्फे दरवर्षी आयोजित होणारा एक राखी फौंजी भाई के नाम” उपक्रम यावर्षी जालंधर सिख लाईट इनफॅन्ट्री रेजिमेंट, राष्ट्रीय रायफल्स २१, हांडवारा आणि मुलधारी आर्मी कॅम्प, जम्मू – काश्मीर या तीन ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर उपक्रमासाठी परिवारातर्फे जालंधर येथे दिशा दळवी, मिनाक्षी राठोड, मनिषा सुर्वे, अर्चना औताडे, प्रणिता भोसले तसेच राष्ट्रीय रायफल्स २१,हांडवारा आणि मुलधारी आर्मी कॅम्प, जम्मू – काश्मीर येथे दिपेश दळवी, हंसराज जाधव, वैभव गोडसे, प्रशांत देसाई आणि अर्जुन धुरी उपस्थित होते.
सदर उपक्रमासाठी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे, सिक्कीमचे मेजर अभय कदम, जालंधर आर्मी कॅम्पचे मेजर हर्निमल बेहेल, धिलिपन सर, राष्ट्रीय रायफल्स २१, हांडवारा येथील कर्नल राजीव, मेजर राजु मोरे, मुलधारी आर्मी कॅम्पचे मेजर विनीत परेरा आणि माजी कर्नल अनिल कदम यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे तसेच सदर उपक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून १६,३०० हुन अधिक राख्या आल्या सर्वात जास्त राख्या ठाणे, डोंबिवली,लातूर,सातारा,रत्नागिरी आणि छत्रपती संभाजी नगर येथून आल्या होत्या असे आम्ही शिवभक्त परिवार,महाराष्ट्राचे संस्थापक – अध्यक्ष दिपेश दळवी यांनी सांगितले. दखल न्यूज महाराष्ट्र .
जाहिरात…