समिर शिरवडकर-रत्नागिरी
रत्नागिरी :- ( दापोली) :-रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तील ग्रामपंचायत गव्हे मधील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण काशिनाथ गुरव यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे सदस्य पद मिळवलं असून,ते अनधिकृत पद रद्द करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४-ग च्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे तृप्ती मनोहर म्हसकर यांनी विवाद क्र.०६/२०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्या कडे दाखल केला आहे.त्याची सुनावणी दि.०४ जुलै २०२३ रोजी झाली.
सदर, विषयी दि.०४ जुलै २०२३ नंतर तब्बल १४ महिन्याने दि.१९ सप्टेंबर २०२३ रोजी १२.०० वाजता झाली.जिल्हाधिकारी कार्यलयाच्या सर्वसाधारण शाखा मध्ये याची चौकशी केली असता,जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रमात, मंत्री दौरे आणि अन्य कारणी व्यस्त असनेले समंधित सुमावण्या ला वेळ होत आहे,अश्या प्रकारच्या सबबी मिळत होत्या.वारंवार पाठपुरावा करून दि.१९ सप्टेंबर २३ ला या प्रकरणी दुसरी सुनावणी झाली. मात्र शासकीय नियमावलीनुसार कोणत्या प्रकरणाला किती दिवस लागतात,याची माहिती,किंबहुना माहिती अधिकार अधिमयम २००५ च्या कलम ४ ( ख) च्या नुसार ठरविण्यात आलेली मानके यांचा सुद्धा विसर जिल्हाधिकारी कार्यलय सर्वसाधारण विभागाला पडल्याचे यावरून दिसुन येते. दखल न्यूज महाराष्ट्र.