लहानपणापासूनच आपले अनेक गुरुजींनी आपल्याला काही ना काही तरी शिकवीत असतात. ते नेहमीच आपल्याला जे शिकवतात ते अर्थपूर्ण आणि त्याच्या पाठीमागची संपूर्ण कल्पना आणि संकल्पना सांगूनच शिकवत आले आहेत. परंतु काही गोष्टींमध्ये आपण या गोष्टी अशाच का ? असं कधीच विचारले नाही. त्या गोष्टी आपण शिकल्या आपल्या पुढच्या पिढीला ही शिकवल्या परंतु त्याच्या पाठीमागील कारण कधीच विचारले नाहीत. मग ती एखादी परंपरेतील गोष्ट असू दे किंवा नवीन ज्ञानातील गोष्ट असेल.
भारतीय परंपरा आणि भारतीय वेद यांचा नीटपणे अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला सहा प्रमुख भाग बघावयास मिळतात. ते म्हणजे शिक्षा अर्थात शिक्षण, कल्प, निरूक्त, छंद, व्याकरण आणि ज्योतिष. ज्योतिषा मध्ये दोन घटक आहेत किंवा त्याचे दोन प्रमुख घटक आहेत. पहिलं म्हणजे ज्योतिष हे संपूर्णपणे गणितावर अवलंबून आहे म्हणून पहिला घटक गणित आणि त्यानंतर त्या गणिताद्वारे मिळणारे किंवा ज्योतिषापासून मिळणारे फलित. ज्योतिषाचे दोन महत्त्वाचे घटक “गणित” आणि “फलित” हे होत. या दोन घटकांवर संपूर्ण ज्योतिष अवलंबून आहे. असे असताना ज्योतिषामध्ये ग्रह आणि राशी या प्रमुख असतात. प्रत्येक ग्रहाचे प्रत्येक राशीतील फलित हे वेगवेगळे असते. आता हे संपूर्ण भविष्य वर्षाच्या बारा महिन्यांकरता विभागले गेले आहे. संपूर्ण वर्ष हे बारा महिन्यांचे आणि ३६० दिवसांचे असते. परंतु हे महिने बाराच का ? किंवा संपूर्ण वर्षाचे ३६० दिवस का ? याचा आपण केव्हाच विचार केला नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण जग आणि संपूर्ण भविष्य हे वर्तुळाकार ३६० अंशामध्ये असते. म्हणजेच वर्तुळाचे ३६० अंश असतात. हे ३६० च का हे कधीही विचार केला नाही.
आपले गृहमंडल हे सूर्याभोवती कायम फिरत असते. पृथ्वी ही आपल्या चंद्र या उपग्रहाला घेऊन सूर्याभोवती फिरत असते. चंद्र हा पृथ्वीभोवती सतत फिरत असतो आणि तो फिरता फिरता सूर्याच्या भोवती सुद्धा फिरत असतो. एका ठिकाणाहून फिरण्यास सुरुवात करून सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते आणि चंद्र ही त्या भोवती फिरत असतो आणि पुन्हा ज्या वेळेला त्याच ठिकाणी येतो त्या कालावधीमध्ये चंद्र हा पृथ्वीभोवती एकूण १२ वेळा फिरतो. म्हणजेच सूर्याभोवती फिरता फिरता चंद्राच्या पृथ्वीभोवती बारा फेऱ्या पूर्ण होतात. त्याच कालावधीमध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरत असते. या संपूर्ण फेरीमध्ये ती स्वतःभोवती ३६० वेळेला फिरते. म्हणूनच भारतीय कालगणनेनुसार वर्षाचे १२ महिने आणि ३६० दिवस हे होतात. आणि याच प्रमाणे बघितल्यास पृथ्वी एका दिवसात सूर्याभोवती ३६० वा भाग पुढे जाते. त्यालाच आपण एक दिवस म्हणतो. आणि यालाच गणितामध्ये एक अंश असे म्हणतात म्हणून वर्तुळाचे ३६० अंश असतात. त्याचप्रमाणे एका महिन्यात पृथ्वी आपल्या कक्षेचा एक तिसांश भाग फिरते असे बारा भाग फिरून ती सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणूनच वर्षाचे बारा महिने केले गेले आहेत. ज्योतिषकारांनी पंचांग आणि ज्योतिष यांची निर्मिती करताना या सर्व गोष्टी जाणून घेऊनच नंतर ज्योतिषाची निर्मिती केली आहे. म्हणूनच भारतीय कालगणनेनुसार वर्षाचे १२ महिने आणि वर्षाचे ३६० दिवस झाले आहेत. त्याचप्रमाणे वर्तुळाच्याही ३६० अंशांची निर्मिती झाली आहे.
श्रीकृष्ण पंडित
रत्नागिरी
8668329202