बातम्या

सुरेखा पाथरे यांना शीतल काळे यांच्या हस्ते स्वरूप योगिनी पुरस्कार प्रदान.

रत्नागिरी: स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ ( पावस रत्नागिरी) यांच्यावतीने दिला जाणारा स्वरुप योगिनी पुरस्कार आस्था सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. सुरेखा देवराम पाथरे यांना सौ. शीतल काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सुरेखा पाथरे यांचा परिचय करुन दिला व मानपत्राचे वाचन केले. यावेळी श्रीनिवास पेंडसे, स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, विवेक भावे , सौ. शीतल काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना सौ. पाथरे यांनी आस्था फाऊंडेशनच्या माध्यमातून स्पेशल एज्युकेशन सुरू झाले. दिव्यांग हेल्पलाईन सुरू झाली. आयुष्यात छोटे- मोठे पुरस्कार मिळाले . हा पुरस्कार म्हणजे स्वामी स्वरूपानंदांचा आशिर्वाद आहे. पुरस्काराच्या रुपाने आज स्वामींचा आशिर्वाद मिळालाय हे काम असे पुढे जाईल. त्यांनी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात विजय रानडे यांच्या नमस्तेसू महामये या देवीस्तुती गायनाने झाली. श्री. रानडे यांचा सत्कार स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी केला. श्रीनिवास पेंडसे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचे त्रिशतकी वर्षानिमित्त पुण्यश्लोक महाराणी या विषयावर व्याख्यानाचे द्वितीय पुष्प गुंफले. श्री. पेंडसे म्हणाले की, मल्हाररावांचे मूळ गाव वाधगाव होते. पुण्याजवळील होळ गावात रहायला गेले म्हणून होळकर असे अडनाव पडले. मल्हारराव होळकरांनी छत्रपतींच्या राज्यविस्ताराला सुरुवात केली. सैन्याचा तळ चौंडीला होता. तिथे सीन नदीच्या काठावर शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी मुलगी आली होती त्यांचे धाडस पाहून बाजीरावांनी अहिल्या देवींचा विवाह खंडेरावांशी लावून दिला. अहिल्यादेवीना राज्यकारभार केला. सामान्याच्या घरामध्ये अहिल्याबाईंनी स्थान निर्माण केले. अहिल्यादेवींनी अनेक ठिकाणी कार्य केले आहे. अहिल्याबाईनी अनेक देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. अहिल्याबाईनी रत्नागिरी जिल्ह्यातील कळबंस्ते गावात रामेश्वर मंदिराची स्थापना केली. अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. अहिल्याबाईंनी महत्वाचे २२ निर्णय घेतले. दत्तक घेण्याऱ्याला जो आवडेल त्यालाच दत्तक घेता येईल असे सांगितले. अहिल्याबाई होळकर यांचे कार्य मोलाचे आहे असे श्री. पेंडसे यांनी सांगितले. श्रीनिवास पेंडसे, संकेत चाळके यांचा सत्कार हृषिकेश पटवर्धन यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद वैद्य यांनी केले तर मंडळाचे कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी आभार मानले.

फोटो ओळी- सौ. सुरेखा पाथरे यांना स्वरूप योगीनी पुरस्कार प्रदान करताना सौ. शीतल काळे

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!