बातम्या

नेते कोणत्याही पक्षात गेले तरी सामान्य शिवसैनिक पक्षाला गतवैभव प्राप्त करून देतील- डॉ .प्रतिक झिमण.

आज शिवसेना माजी जि.प.अध्यक्ष श्री.जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची बातमी नुकतीच वाचनात आली . खरतर आबांनी हा निर्णय का घेतला हे अनाकलनीय आहे , पण आता घेतलाय तर त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा . नाचणे सह संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात सामान्य शिवसैनिक आज सुद्धा जिथे आहेत तिथेच आहेत . कोणीही नेते जरी अन्य पक्षात गेले तरी सामान्य शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच गतवैभव प्राप्त करून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही . शिवसैनिक जोमाने काम करतायत हे मागील लोकसभा निवडणुकीतील मताधिक्याने दाखवून दिले आहे . आदरणीय पक्षप्रमुख लवकरच विधानसभेसाठीचा उमेदवार जाहीर करतील , तेव्हा सर्व शिवसैनिक अधिक जोमाने काम करून रत्नागिरी विधानसभेवर भगवा फडकवतील यात शंका नाही , असा विश्वास शिवसैनिक डॉ.प्रतिक झिमण यांनी व्यक्त केला आहे .

दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!