बातम्या

ग्लोबल ते लोकल नेतृत्व : डॉ. चंद्रशेखर निमकर..

प्रत्येकाशी पहिल्याच भेटीत आपण वर्षानुवर्षीचे स्नेही आहोत, असे वागणाऱ्या आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असणाऱ्या डॉ. चंद्रशेखर निमकर यांचा आवाका ग्लोबल ते लोकल आहे. कामानिमित्त सातत्याने युरोप, अमेरिका दौऱ्यावर असणारे डॉक्टर निमकर अलीकडे राजकारणात सक्रिय झाले आहेत. आज रविवार दि. ६ ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात.. डॉ. चंद्रशेखर निमकर यांचे मूळ गाव गणपती पुळ्याजवळचे निवेंडी. ते परदेशात जाऊन येऊन असले तरी गावाशी नाळ जोडलेली आहे. अँनालिटीकल केमिस्ट्रीतील डॉक्टरेट, सांडोझ नोव्हार्टीस या बलाढय फार्मास्युटिकल कंपनीतील उच्च पदावरील नोकरी ते थेट आठ हजार कोटी रुपयांचा महसूल असलेल्या आल्वोजन कंपनीचा जागतिक पातळीवरचा संचालक (डायरेक्टर, ग्लोबल सप्लाय) हा प्रवास करतानाच असंख्य सामाजिक, शैक्षणिक संस्थांबरोबर काम सुरु आहे.

एमबीए, एलएलबी, हार्वर्ड विद्यापीठासह जगातील अनेक नामांकित विद्यापीठातील सेमिनार, चर्चाना उपस्थिती, लिन ब्लॅकबेल्ट, सिक्स सिग्मा, ह्युमन राइट्समधील पदव्युत्तर शिक्षण अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळी शैक्षणिक पात्रता मिळवणारे डॉक्टर निमकर अनेक ठिकाणी परीक्षक, अभ्यागत लेक्चरर म्हणूनही जातात. फोटोग्राफी इतके तबला वादनातही रंगून जातात. प्रख्यात तबलजी श्री. नाना मुळे यांच्याकडे त्यांनी रीतसर दहा वर्षे तबला वादनाचे शिक्षण घेतले आहे. वयाच्या १८ व्या वर्षांपासून गेली ३६ वर्षे त्यांनी प्रत्येक वर्षी १०० वृक्षारोपणे केली आहेत. पैकी ८० टक्के वृक्ष आजही सुस्थितीत उभे आहेत. डॉ. निमकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 2024 मध्ये कृषी सन्मान पुरस्कार राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जुलै महिन्यात प्रदान करण्यात आला आहे. दुर्धर रोगाने त्रस्त व्यक्तींचा उपचाराचा खर्च डॉ. निमकर यांनी उचलला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च ते दर वर्षी करतात. ते स्नेहज्योती निवासी अंधशाळा स्थापनेपासून गेली १३ वर्षे चालवत आहेत.

जागतिक महामारी कोरोना काळात योद्धा म्हणून त्यांनी काम केले. तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस ठाणी व रत्नागिरी कारागृह निर्जंतुकीकरण केले. पोलिसांना व रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अँटी मायक्रोबिअल या दर्जेदार कापडाचे परंतु २०० वेळा धुवूनही जिवाणू विषाणू प्रतिबंधक क्षमता राखणारे असे ५०० मास्कचे वाटप भेट म्हणून केले. कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांवर खूप ताण पडला होता, त्यांची पाणी, नाश्ता याची सोय केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विकसित भारत संकल्पनेने प्रेरित होऊन डॉक्टर निमकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आज ते दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 2047 मध्ये विकसित भारत होण्याकरिता लागणारे योगदान डॉक्टर निमकर देत आहेत. त्यांच्यासारख्या सुशिक्षित, सुसंस्कृत, राजकीय नेतृत्वाची गरज आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात डॉ. निमकर भरीव कामगिरी करत आहेत. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!