समिर शिरवडकर- रत्नागिरी.
राजापूर:-( जैतापूर) :- जिल्हा परिषद शाळा मांजरेकर वाडी जैतापूर या शाळेमध्ये असलेल्या कायमस्वरूपी शिक्षकाची बदली झाल्यामुळे ही शाळा शून्य शिक्षकी झाली होती त्यामुळे गेले काही दिवस शिक्षक अदलून बदलून कामगिरीवर येत होते.
पालक वर्ग ग्रामस्थ व ग्रामपंचायत सरपंच, वार्डच्या सदस्या यांनी ही बाब वारंवार केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी यांच्या कानावर घातली तसेच लेखी निवेदन सुद्धा दिले परंतु काही हालचाल होत नव्हती, तेव्हा सरपंच राजप्रसाद राऊत, ग्रामस्थ श्रीकृष्ण राऊत, माजी उपसरपंच प्रसाद माजरेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. आराध्या माजरेकर, ग्रामस्थ शौनक पावसकर, अंगणवाडी सेविका सौ अनुराधा राऊत, अंगणवाडी मदतनीस श्रावणी पावसकर यांनी *प्रतिथयश माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य सचिव समिर शिरवडकर* यांच्याशी संपर्क साधला…तेंव्हा तात्काळ त्यांनी श्रीकृष्ण राऊत, शौनक पावसकर, सौ श्रावणी पावसकर यांच्यासह राजापूर येथे पंचायत समितीत भेट देऊन गट शिक्षणाधिकारी जाधव यांच्याशी चर्चा केली व राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार माननीय किरण ( भैया ) सामंत यांच्याशी फोन वर संपर्क साधला व या एका फोन कॉल वर तात्काळ गटशिक्षणाधिकारी जाधव यांनी एका शिक्षिकेची नेमणूक जि प शाळा माजरेकर वाडी जैतापूर येथे केली.
या सहकार्याबद्दल माननीय आमदार किरणजी सामंत साहेब समीरजी शिरवडकर यांचे ग्रामस्थ पालक आभार व्यक्त करत आहेत, त्याचप्रमाणे जि. प. शाळा मांजरेकरवाडी जैतापूर येथे रिक्त झालेल्या जागेवर शिक्षिका म्हणून श्रीम. साखरकर मॅडम यांना पंचायत समिती मधून आज नियुक्ती देण्यात आली. त्याबद्दल नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत करताना ग्रामपंचायत सदस्य आराध्या माजरेकर, अंगणवाडी सेविका सौ. अनुराधा राऊत अंगणवाडी मदतनीस सौ. श्रावणी पावसकर, शिक्षक डूमणे सर, ग्रामस्थ म्हणून शौनक पावसकर, सौ. प्रिया मांजरेकर, सौ ज्योती माजरेकर आदी ग्रामस्थ ,पालक, मुले यांनी स्वागत केले.
जाहिरात अथवा बातमीसाठी आजच संपर्क करा : 9860625740. दखल न्यूज महाराष्ट्र