देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियानांतर्गत ‘अनुवाद कौशल्य’ कार्यशाळा संपन्न झाली. या एकदिवसीय कार्यशाळेत रत्नागिरी येथील प्रा. विष्णुप्रिया आठल्ये यांनी ‘अनुवाद कौशल्य आणि करीयरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. सौ. आठल्ये यांनी चेतन भगत यांच्या अनेक इंग्रजी पुस्तकांचे अनुवाद केले आहे. या क्षेत्रात करीयरच्या उत्तमोत्तम संधी मिळविण्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे अनुवादाचे काम करता येते. उत्तम अनुवाद कसा करावा, कला, शास्त्र आणि व्यवसाय अशा भिन्न भिन्न क्षेत्रात अनुवाद करताना कोणती काळजी घ्यावी लागते, ललित साहित्यकृतींचे अनुवाद हे एक प्रकारचे अनुसर्जनच कसे असते अशा अनेक गोष्टींवर त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर व उपप्राचार्य डॉ सरदार पाटील उपस्थित होते. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या येऊ घातलेल्या युगात अनुवाद कौशल्यावर रोजगाराच्या व व्यावसायिक संधी प्राप्त करण्यासाठी, अशा कार्यशाळा उपयुक्त असल्याचे मनोगत व्यक्त केले. प्रथम व द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास पत्रिकेशी संबधित अनुवाद या विषयावर मार्गदर्शन मिळावे, या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली होती.
कार्यशाळेच्या प्रारंभी प्रा. स्वप्ना पुरोहित यांनी प्रा. सौ. आठल्ये यांचा परिचय करून दिला व प्रा. डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी आभार मानून कार्यशाळेचा समारोप केला. या कार्यशाळेत एकूण ४४ विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. वर्षा फाटक, प्रा. स्नेहलता पुजारी, प्रा. अजित जाधव, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे आणि सहाय्यक स्वप्नील कांगणे, रोशन गोरूले यांनी विशेष मेहनत घेतली.
फोटो-व्यासपीठावर प्रा. कु. पुरोहित, ग्रंथपाल प्रा.ली मायंगडे, प्रा. डॉ. फाटक, प्रा. सौ. आठल्ये यांचे स्वागत करताना उपप्राचार्य डॉ. पाटील आणि प्रा.डॉ. श्री. आठल्ये.
