■ सामीर शिरवडकर-रत्नागिरी.
राजापूर :- ( जैतापूर) :- राजापूर मधील जैतापूर मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही (पर्व दुसरे) जैतापूर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज १९ तारीख ला मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, या स्पर्धेची क्रिकेट रसिकांच्या मनात फार उत्सुकता लागून राहिली होती जैतापूर एसटी स्टँड परिसरातील लाला मैदानात प्रकाश झोतात हे सामने खेळवले जातील अंडर आर्म प्रकारातील हे सामने खेळण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातून अनेक नावाजलेले संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. प्रथम पारितोषिक २२,२२२ /- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक ११,१११/- व आकर्षक चषक असे स्पर्धेचे स्वरूप असून प्रवेश फी रुपये १०००/- आहे. सदर स्पर्धा यू ट्यूब लाईव्ह होणार असून, या स्पर्धेचे आयोजन जैतापूर मधील नावाजलेले व्यवसायिक काझी कुटुंबीय यांनी केले आहे.जिल्ह्यातील क्रिकेटपटू सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष शरफुद्दिन काझी, व उपाध्यक्ष श्रीकृष्ण राऊत यांनी खेळाडूंना केले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन शरफुर्द्दिन काझी यांनी श्रीफळ वाढवून व फीत कापून केले, यावेळी सरपंच राजप्रसाद राऊत, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र प्रसाद राऊत, माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य सचिव समीर शिरवडकर, ग्रा प सदस्य दिवाकर आडवीकर, उद्योजक वैभव कुवेस्कर, नासिर काझी, जलाल काझी, सलीम काझी,प्रसाद मांजरेकर, उदय गिरकर ,हुसेन काझी,जब्बार काझी ,डंबे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र .
