रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. आ.रविंद चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्हाध्यक्ष मा.राजेश सावंत यांचे मार्गदर्शनाखाली तसेच अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्यातून, तालुकाध्यक्ष दादा दळी यांचे उपस्थितीत नाचणे मधील उबाठा गटाचे पदाधिकारी श्री. संदिप सुर्वे, दिपक गावडे, दिपक सुपल, घडशी यांनी नुकताच मुंबई येथे चव्हाण साहेबांच्या उपस्थीतीत भारतीय जनता पक्षामधे प्रवेश केल्याबद्दल नाचणे भाजपा पंचायत समीतीच्या वतीने नाचणे येथे त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळेस रत्नागिरी तालुका दक्षिण चे ऊपाध्यक्ष सुनिल आडीवरेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ.दिप्ती फडके, बुथ अध्यक्ष सुधीर भोरे, सुनिल नाचणकर, विजय सुर्वे, समीर सावंत, बंड्या मोरे आणि रत्नागिरी तालुका दक्षिण चे सरचिटणीस ओंकार फडके ऊपस्थीत होते.
उबाठा गटातील सर्वांचे स्वागत करताना नाचणे जि.प.गट आता अधिक प्रबळ होऊन येणाऱ्या पंचायत समिती, जि.प. निवडणुकीत भाजपाचे काम उत्कृष्ट रित्या होईल असे सरचिटणीस ओंकार फडके यांनी सांगीतले. तसेच नाचणे मधील महीला मोर्चा, युवा मोर्चामधील अनेक पदाधिकारी देखील भाजपा मधे लवकरच प्रवेश करतील असे श्री. संदीप सुर्वे यांनी सांगीतले. लवकरच भारतीय जनता पक्षाचे नाचणे विभागाचे कार्यालय सुरू करून या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करूया असे सर्व कार्यकर्त्यांमार्फत सांगण्यात आले.
दखल न्यूज महाराष्ट्र.