बातम्या

फैजाने अत्तार कोकण नगर येथे रमजान ईद उत्साहात साजरी..

                रमजान ईद हा मुस्लिमांचा महत्त्वाचा सण आहे. रमजान हे मुस्लिमांच्या बारा महिन्यांतील एका महिन्याचे नाव आहे. रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. इस्लाममध्ये ईद-उल-फित्र हा सण रमजानचा संपूर्ण महिना उपवास केल्यानंतर नवीन चंद्र पाहण्याच्या निमित्ताने साजरा केला जातो. हा उपवास सोडण्याचा सण म्हणूनही लोकप्रिय आहे. हा सण रमजानच्या शेवटी साजरा केला जातो.
दावते इस्लामी शाखा रत्नागिरी कोकण नगर फैजाने अत्तार येथे रमजान ईद ची नमाज अल्ताफ कुरेशी यांनी पठण केली,तसेच उद्यमनगर फैजाने गौसे आजम येथे  जाबीर रजा   यांच्या हस्ते नमाज पठण तसेच सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या , आणि फैजाने रजा बाजारपेठ येथे अब्दुल हाफिज  यांच्या हस्ते नमाज तसेच सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या,या वेळी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,तसेच ख्वाजा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचे रत्नागिरी चे अध्यक्ष फारूक जरिवाला, साजिद मेमन, अकील मेमन उपस्थित होते.                                      दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!