बातम्या

मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार….

जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेचे 9 हफ्ते आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर एप्रिल महिन्याचे पैसे  कधी मिळणार असा सवाल महिलांच्या मनात आहे. यासंदर्भातही माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्यात 30 तारखेला अक्षय्य तृतीया असून त्याच मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार असल्याचे समजते.
             मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे बँक खात्यावर टाकण्याकरिता सरकारला आत्ता प्रत्येक महिन्यात काहीसा उशीर होत आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एप्रिल महिन्याचा हप्ता 30 तारखेला महिलांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार लाडकी बहिण योजनेचा हफ्ता प्रत्येक महिण्याच्या 8 तारखेला होणार असे सांगितलं गेले असले तरी  एप्रिलचा हफ्ता 30 तारखेला मिळणार आहे अशी माहिती मिळत आहे.   

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!