एक विचार सभा उस्फूर्तपणे संपन्न..
रविवार दिनांक 4 मे रोजी थिबा पॅलेस परिसरातील महिलांची एक बैठक श्रद्धा कळंबटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली या बैठकीमध्ये महिलांनी एकत्र येणं, विचारविनिमय करणे आवश्यक आहे का? यावर चर्चा करण्यात आली.
या चर्चेमध्ये सर्वच महिलांचे एकमत झाले काहींनी मनोरंजनासाठी महिलांनी एकत्र आलं पाहिजे, काहींनी एकमेकांच्या अडचणी सुखदुःख वाटून घेण्यासाठी तर काहींनी आपल्या कुटुंबासाठी २४ तास राबणाऱ्या महिलांना मोकळा श्वास घेता यावा, त्यांना नवीन ऊर्जा मिळावी यासाठी आपण एकत्र जमलं पाहिजे अशी मत मांडली .
काहींच्या मते आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर स्वच्छ असावा प्रदूषणमुक्त असावा यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे ठरले त्यांना श्रद्धा कळंबटे यांनी अनबॉक्स या प्लास्टिक, जुने कपडे आणि इलेक्ट्रॉनिक्स कचरा गोळा करणाऱ्या संस्थेची माहिती आणि संपर्क नंबर दिला त्यावेळी उपस्थित सर्व महिलांनी उस्फूर्तपणे अनबॉक्सला स्वतःला जोडून घेतले आणि इतरांनाही जोडून घेऊ असे ठरवले .
याचबरोबर आपल्या आजूबाजूला काही कौटुंबिक किंवा सामाजिक समस्या आढळल्यास एक जागरूक नागरिक म्हणून आपण ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे ठरविण्यात आले .यातून आत्महत्या ,घर सोडून पळून जाणे ,मानसिक आजार इत्यादी सामाजिक समस्या सोडवण्यास हातभार लागू शकतो .आपल्या स्वतःच्या वैयक्तिक विकासाबरोबरच सामाजिक स्वास्थ्य सुद्धा निरोगी, निकोप राहावं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं एकमताने ठरविण्यात आले
या चर्चेत संजना संतोष तारी, कांचन दीपक शिंदे ,प्रज्ञा विनोद टाकळे, निधी निलेश आखाडे, वंदना प्रदीप वेर्णेकर, सुनीता सुहास फुटाणे आणि श्रद्धा कळंबटे यांनी भाग घेतला होता. या सभेला महिलांचा उस्फूर्त पाठिंबा मिळाला थिबा पॅलेस परिसरातील कोणीही इच्छुक महिला या चळवळीत सहभागी होऊ शकते त्यांनी 9422430362 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्रद्धा कळंबटे यांनी केले आहे.