शेतीला जोडधंदा म्हणजे कुक्कुटपालन..
सध्या धावत्या युगात वाढती लोकसंख्या आणि प्रचंड वाढणारी महागाई यांच्याशी लढा देताना सर्वसामान्य व्यक्तीपासून ते मजदूर व शेतकरी यांचे खूप हाल व दुरावस्था होत आहे. शेती सुद्धा निसर्गाच्या प्रकोपामुळे, अनियमित मिळणाऱ्या शेतमालामुळे, हमीभाव न मिळाल्याने अशा वेगवेगळ्या कारणामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याचे प्रमाण देखील महाराष्ट्रात वाढत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना एकाच उत्पन्नावर किंवा एक पीक घेण्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेतीपूरक किंवा शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य शेती इत्यादी शेती पूरक व्यवसाय करून आपले उत्पन्न वाढवले पाहिजे यामधील शेतकऱ्यांना कमी खर्चात कमी वेळात करता येणारा जोडधंदा म्हणजे कुक्कुटपालन होय.

दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : वर्षा परशुराम ढेकणे.
(सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका.)
कुक्कुटपालन व्यवसाय शेतकरी, मजूरदार, महिलावर्ग, भूमिही शेतकरी सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकतो. कुक्कुटपालनामध्ये कोंबडी पालन, बदक पालन, बटर पालन, लावा पालन, इत्यादींचा सुद्धा समावेश होतो. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी अंडी व मांस उत्पन्नाची मोठ्या प्रमाणात गरज व मागणी आहे. त्यामुळे कुक्कुटपालन हा व्यवसाय कमी वेळात कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारा असून या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले गेले पाहिजे. कुक्कुटपालनाचा मुख्य उद्देश अंडी उत्पादन व मांस उत्पादन करणे हा आहे. यासाठी शेतकरी लेयर फार्म, बॉयलर फार्म व गावरान फार्म सुरू करू शकतो. अंडी व मांस उत्पादन यातील ज्या मुख्य उद्देशासाठी हा व्यवसाय करायचा असेल त्यानुसार त्या भागामध्ये सूट होणाऱ्या विकसित संकरित जाती आणून हा व्यवसाय केला जातो. जसं की अंडी उत्पादनासाठी लेयर फार्म वर्षभर अंडी देणाऱ्या संकरित जाती विकसित केल्या गेल्या आहेत. एक संकरित कोंबडी वर्षाला 250 - 300 अंडी घालू शकते तर मांस उत्पन्नासाठी विकसित केलेली कोंबडी कमी खाद्य खाऊन जास्त मांस वजन देते.

दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : संदीप (बाबू) सुर्वे.
(भाजपा शहर सरचिटणीस रत्नागिरी. )
ग्रामीण भागामध्ये परसातील कुक्कुटपालन, मुक्त संचार कुक्कुटपालन पद्धती जास्त सोयीची व कमी खर्चिक ठरते व्यवसायाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना बंदिस्त कुक्कुटपालन व अंडी उत्पादनासाठी पिंजरा पद्धती, बॅटरी पद्धत व कॅलिकोनिया पद्धत, या पद्धतीने उत्पन्न घेता येईल. पक्षांना लागणारे खाद्य ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन, गहू, तांदूळ, मासे कुट्टी, शेंगदाण्याचा पेंड इत्यादी धान्याचा भरडा करून पक्षांना खाद्याची व्यवस्था करू शकतो. कुक्कुटपालनामध्ये खाद्याचा खर्च 70 टक्के येत असल्याने खाद्याला पर्याय म्हणून तयार करून पक्षांच्या खाद्याची व्यवस्था करू शकतो. मुख्य व्यवसाय कुक्कुटपालन असला तरी शेतकरी पोल्ट्रीवर आधारित त्या व्यवसायाची संलग्न इतर व्यवसाय सुद्धा करू शकतो. जसे की अंडी विक्री, माऊस विक्री, चिकन सेंटर ,अंडी उबवून पिल्ले मिळवणे, पशु पक्षी खाद्य निर्मिती उद्योग, कोंबडी खत, अझोला निर्मिती, कुकुटपालन प्रशिक्षण देणे मांस व अंड्यापासून खाद्यपदार्थांची निर्मिती करणे व त्यांची विक्री करणे

दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. पंकज मारुती पुसाळकर.
(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी. प्रभाग क्र.7)
अशा प्रकारे कुकूटपालनातून अनेक व्यवसाय आपल्याला जोडधंदा म्हणून सुरू करता येतील व शेतकरी लाखो रोपाचे उत्पन्न यातून घेऊ शकतो. कोकणातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा करता यावा म्हणून प्रकाश कुळ्ये आणि मिलिंद कुळ्ये यांनी दोस्ती पोल्ट्री फार्म ची स्थापना करून शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसाय मोफत माहिती, मार्गदर्शन करून व्यावसायिक तयार करीत आहेत. पोल्ट्री सोल्युशन हब या यूट्यूब चैनल वर कुकूटपालन संबंधी माहिती मार्गदर्शन यांच्यामार्फत केली जाते. अशा प्रकारे कुकूटपालन हा व्यवसाय सर्वसामान्य व्यक्ती करून आपले उदरनिर्वाहाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकतात.
लेखन : प्रकाश कुळ्ये +917972539495
दखल न्यूज भारत