गुहागर : दिवाळी सण म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच आनंदाचा क्षण, गोडधोड खाऊ,मौज-मजा, मस्ती, नवीन कपडे सगळीकडे आनंदी आनंदच असतो दिवाळी सणात लहान मुलांकडून वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या जातात; लहान मुलांना यामध्ये एक विलक्षण आनंद मिळतो. अशीच जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती गुहागर मधील काही मुलांनी साकारली आहे. गुहागर तालुक्यातील साखरी आगर कातळ वाडी तील मुलांनी साकारलेला जंजिरा किल्ला पाहण्यासाठी अनेकांकडून गर्दी केली जात आहे. तयार करण्यात आलेल्या या प्रतिकृतीचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. दखल न्यूज महाराष्ट्र..
- Home
- गुहागर तालुक्यातील साखरी आगर कातळ वाडी तील मुलांनी साकारला जंजिरा किल्ला.