बातम्या

डुक्कर समजून चक्क म्हशीवर झाडल्या गोळ्या; बंदुकीसह दोघे ताब्यात

संगमेश्वर : तालुक्यातील मांजरे कळकदेकोंड येथे डुक्कर समजून चक्क म्हशीची शिकार केल्याची खळबजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बंदूक आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांची शिकार होत असते शिकारी रात्री चांगलेच सक्रिय होतात. जंगलात चरण्यासाठी गेलेल्या म्हशीला डुक्कर समजून तीची शिकार करणाऱ्या दोन शिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली विनापरवाना बंदूक आणि काडतुसे संगमेश्वर पोलिसांनी जप्त केली आहेत. मिलिंद महादेव चरकरी, निनाद धोंडु घाणेकर (दोन्ही रा.नरबे करबुडे ता. जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद नरेंद्र रघुनाथ देसाई यांनी पोलिस स्थानकात दिली. संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र रघुनाथ देसाई (रा. मांजरे देसाईवाडी) यांनी आपल्या मालकीची म्हैस रानात चरण्याकरीता सोडली होती. मात्र सायंकाळ पर्यंत म्हैस घरी परत आली नसल्याने देसाई यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वा.चे सुमारास ही म्हैस दिसून आली. यावेळी म्हशीची शिकार झाल्याचे निदर्शनास आले. म्हैशीच्या पुढील डाव्या पायावर बंदुकीने 6 गोळ्या झाडून तीला जखमी करून विकलांग केले होते. म्हशीवर उपचार करण्यात येत आहेत. नरेंद्र देसाई यांनी संगमेश्वर पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. चौकशी दरम्यान मिलिंद चरकरी व निनाद घाणेकर (दोन्ही रा. नरबे करबुडे ता. जि. रत्नागिरी) यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी डुक्कर समजुन म्हैशीची शिकार केल्याचे कबूल केले. पोलिसांनी निनाद घाणेकर त्याचे ताब्यातील विनापरवाना बंदुक आणि काडतुसे जप्त केली आहेत.
ही कामगिरी संगमेश्वर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख, सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे, पोलिस अंमलदार संतोष झापडेकर, किशोर ज्योयशी, सचिन कामेरकर, म्हसकर, शिंदे, आव्हाड यांनी कामगिरी केली.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ जाहिरात…..
▶️ संजय सुर्वे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
▶️ बुवा संजय सुर्वे ,भडे गावचे रहिवासी लांजा तालूका भजन मंडळ अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा आदर्शभजन मंडळ सक्रिय सभासद, पांचाळ बुवा समिती सदस्य. मुंबई पासून सावंतवाडी पर्यंत डबलबारीचे सामने ज्यांनी केले असे बुवा संजय सुर्वे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
▶️ शुभेच्छुक : संपूर्ण कोकण विभाग, भजन मंडळ परिवार, रत्नागिरी, लांजा, भडे मित्र परिवार.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!