देवरुख : वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालय आणि श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख यांनी संयुक्तपणे ‘मला प्रभावित करणारे पुस्तक’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी स्पर्धा आयोजनाचा उद्देश, जीवनातील वाचनाचे महत्त्व, कोणते महत्त्वपूर्ण व उपयुक्त वाचन करावे यासंबंधी मार्गदर्शन केले
या स्पर्धेचे परीक्षण सुजाता भागवत, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. मृण्मयी परांजपे यांनी केले. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक- पायल दोरखडे (आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख)
द्वितीय क्रमांक- वेदांती राव (छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर जि.प. शाळा नं.४) तृतीय क्रमांक- श्रेया मेस्त्री (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख)
उत्तेजनार्थ :-
१. सायली महाडिक
२. सोनाली सुर्वे
३. तनुजा शिवतरकर
(तिघीही आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरुख)
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री सद्गुरु लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी, ग्रंथपाल श्रद्धा आमडेकर, देवरुख महाविद्यालयाच्या डॉ. वर्षा फाटक, प्रा. स्नेहलता पुजारी, ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. धनंजय दळवी, सहाय्यक अमोल वेलवणकर व रोशन गुरव यांनी मेहनत घेतली.
छाया- प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांच्या फोटोचा कोलाज. दखल न्यूज महाराष्ट्र
