कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण.
रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरीमधील रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यात भाजपाने दणदणीत यश मिळवले आहे. ८ ठिकाणी भाजपाचे सरपंच विराजमान झाले असून, एकूण ६१ सदस्य निवडून आले आहेत.
ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे वाढते मताधिक्य पाहून कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. अत्यंत महत्वपूर्ण ग्रामपंचायत निवडणुकीत दक्षिण रत्नागिरीमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. दक्षिण रत्नागिरीतील रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर या चार तालुक्यात भाजपाने चांगले यश प्राप्त करत ग्रामीण भागात भाजपा चांगल्याप्रकारे कार्यरत असल्याचे सिद्ध झाले आहे.
राजापूरमध्ये २, लांजा ५ तर संगमेश्वर येथे एका ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच विराजमान झाले आहेत. तसेच राजापूर येथे १४, रत्नागिरीत ५, लांजामध्ये ३७ तर संगमेश्वरमध्ये भाजपाचे ५ सदस्य निवडून आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार कामगिरी करत भाजपाने चांगले यश मिळवले आहे. निवडून आलेले सर्व सरपंच तसेच सदस्यांनि विजय मिळतात जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांचे भेट घेतली. भाजपा दक्षिण रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र