मेष : आर्थिक दृष्ट्या चांगला दिवस आहे. आज मौजमजा करण्यासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जाल. तुमचा जोडीदार आज तुमच्याबरोबर खुश असणार आहे. चांगले वैवाहिक आयुष्य हे आनंदी जीवनासाठी महत्त्वाचे आहे. सुट्टीसाठी तुम्ही काहीतरी प्लान बनवाल.
वृषभ : आजच्या दिवसात तुम्हाला थोडासा तणाव जाणवेल. तुमच्या वस्तूंची तुम्ही काळजी घ्या. ती चोरीला जाऊ शकते घरातील व्यक्तींची काळजी घ्या, त्यांची तब्येत बिघडणार नाही यासाठी औषधोपचार करा. आज आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे.
मिथुन : व्यापार उद्योगात आज तुम्हाला चांगला नफा होईल. आज तुम्ही तणावमुक्त राहाल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करू देऊ नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या तुम्ही तुमच्या जोडीदाराशी सर्व गोष्टी शेअर करू शकता.
कर्क : तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न करायचे आहेत. जेणेकरून तुम्ही त्यातून बाहेर याल. मर्यादा पेक्षा जास्त खर्च करू नका. तुम्ही बऱ्याचदा स्वतःला वेळ देणे विसरत आहात. स्वतःसाठी वेळ द्या. सोशल मीडियाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करणे आरोग्यासाठी चांगले नाही.
सिंह : वाहनासाठी खर्च करावा लागू शकतो. आज तुम्ही एकदम शांत रहाल. तुम्ही कोणाचातरी सल्ला घेऊ शकता. काम पैसा मित्र कुटुंबीय नातेवाईक हे सर्व एक बाजूला आणि तुम्ही व तुमच्या जोडीदार दुसऱ्या बाजूला एकमेकांना सहकार्य करून निर्णय घ्या. सर्वांचा सन्मान करणे तुम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही सर्वांच्या नजरेत चांगले आहात हे विसरू नका.
कन्या : तुम्ही आखलेल्या प्रयोजनामध्ये काहीसा बदल करू शकता. तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यासाठी सक्षम असाल, मुलांची चांगली कामगिरी याबाबत तुम्ही गर्व अनुभवाल. जोडीदाराची उत्तम साथ मिळणार आहे.
तुळ : तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आज नक्की करा. जे तुमचा वेळ आणि पैसा तुम्हाला वापरण्यासाठी भाग पाडतील अशा लोकांपासून दूरच रहा. आर्थिक गणित सांभाळणे तुमच्या हातात आहे. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी चांगला आहे. आज तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद मिळतील. कुठल्या जवळच्या धार्मिक कामात तुम्ही सहभागी होऊ शकता.
वृश्चिक : मित्रमंडळींबरोबर वेळ घालवाल आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. मात्र अतिखाणे आणि मद्यपान यावर नियंत्रण ठेवा त्रास होऊ शकतो. धन खर्च करू नका. प्रवास घडेल त्यामुळे थोडा ताण जाणवेल.
धनु : आज चांगल्या कामासाठी तुम्ही स्वतःची ऊर्जा वापराल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत तुम्हाला द्यायला तयार असतील. मोकळा वेळ घराच्या सुशोभी करण्यासाठी घालवाल. आज तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात कौतुकाची थाप आज तुम्हाला मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
मकर : आज येणाऱ्या प्रत्येक समस्येवर तुम्ही मात करू शकता. नवीन योजना आखताना इतरांचा सल्ला घ्या त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या. प्रेमाचा विषयात काहीशी अडचण येऊ शकते.
कुंभ : आज तुम्ही चांगल्या मूडमध्ये असाल. मैदानीखेळ खेळण्यांमध्ये आज तुम्हाला आनंद मिळेल. बऱ्याच आर्थिक समस्येतून तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न कराल. आज नवीन मित्र जोडले जातील. तुमच्या घरातील व्यक्तींसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष करू नका.
मीन : अति विचार करू नका. आर्थिक अडचणीतून तुम्ही लवकरच बाहेर येणार आहात, परिस्थिती बदलण्यासाठी वेळ द्या. प्रेमामध्ये काही शुल्लक गोष्टींना माफी द्या. एखादी गोष्ट ताणली की ती तुटते हे विसरू नका. तडजोड ही चांगल्या आयुष्यासाठी महत्त्वाचे आहे. चांगल्या मित्रांचे जीवनात असणे खूप गरजेचे आहे.
दखल न्यूज महाराष्ट्.