रत्नागिरी : एकमुखी दत्त मंदिर,घुडेवठार रत्नागिरी यांच्यावतीने प्रती वर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सव करण्यात आला. यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. त्यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्ते व दूरदर्शनचे अधिकारी जयु भाटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयू भाटकर, माजी नगरसेविका दया चवंडे, भाजपा तालुका अध्यक्ष मुन्ना चवंडे, माजी नगरसेविका सौ.सत्यवती बोरकर, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान बोरकर, विजू मुंडये, मुकुंद विलणकर, बाबल मयेकर, कल्पिता सुर्वे, बाळा मालगुंडकर, सुनीत घुडे व घुडेवठार, चवंडे वठार, पाटीलवाडी, विलणकर वाडी येथील ग्रामस्थ उपस्थितीत होते.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*