रत्नागिरी : टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व टेनिस क्रिकेट असोशिएशन ऑफ ओडिसा याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पाचवी राष्ट्रीय जुनियर टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मधुरा येथे उत्साहात संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्र संघ उपविजेता व मुंबई संघाला तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल सर्व जिल्ह्यातून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी इंडिया टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर, महाराष्ट्र सचिव मिनाक्षी गिरी आदि मान्यवरउपस्थित होते. यावेळी इंडिया टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व त्याचे महत्त्व सांगितले. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून मुलांचे 25 संघ व मुलींचे 13 संघ उपस्थित होते. टेनिस क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना झारखंड विरुद्ध महाराष्ट्र असा झाला. यामध्ये झारखंडच्या खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे कामगिरी करत संघाला विजयश्री मिळवून दिला व महाराष्ट्र संघाने चांगले प्रयत्न करून या अंतिम सामन्यात चांगली चुरस निर्माण करून उपविजेता ठरला. यामध्ये महाराष्ट्र संघाकडुन सुयश दिवाळे (कॅप्टन) मानस पाटील (vc),राजेश कदम, आदिल पटेल,कुणाल ढाकर, सोमनगौडा बिरादार,स्वरूप कदम, प्रथमेश जानस्कर,कल्पेश शेलार,साहिल सावंत,अक्षय, साहिल नमाये,भावेश अहिरे, प्रल्हाद गोरूले , तसेच मुंबई संघकडून सौरभ जानस्कर(c), स्वप्नील मारवाडकर(vc), पियुष पवार,संदेश गायकवाड, वेदनात निवाटे,विवेक चित्तोडिया,निरंजन कांबळे, सागर चोरमले,श्रीकांत टाकळे,सोहेल शेख,सर्वेश शर्मा, कैफ फारुखी या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेल्या बद्दल तसेच मुंबई संघाला तिसरा क्रमांक मिळाल्याबद्दल. त्याबद्दल महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या सचिव मिनाक्षी गिरी, ,महाराष्ट्र टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंमरे ,विलास गिरी, सुमित अनेराव, रोशन किरडवकर, रणजित पवार,आपलं कोकण चे प्रत्रकार राहुल वर्दे सर, दिलीप दिवाळे सर, वनगुळे गावचे सरपंच प्रभाकर गुरव, गणेश खानविलकर, सुरेश भालेकर, अशोक गुरव, प्रणव खानविलकर, सुरज अनेराव, अमेय खानविलकर, अजय मोर्ये,सर्वांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच संघाच्या विजया साठी मार्गदर्शक म्हणून स्वप्नील ठोंमरे, महेश मिक्षा महाराष्ट्र मार्गदर्शक विजय उंबरे व मुंबई मार्गदर्शक सिद्धेश गुरव या सर्वांनी अथक परिश्रम घेतले.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*