रत्नागिरी : फुणगुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आजूबाजूच्या गावांमधून अनेक रुग्ण तपासणीसाठी येत असतात. मात्र या रुग्णांना तासंतास डॉक्टरांची वाट पाहत ताटकळत बसावे लागते, अनेकदा डॉक्टर खूप उशिरा येत असल्याने लोकांच्या मनात याबाबत नाराजी दिसून येत आहे.
रुग्णांना तासंतास बसून राहावे लागत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक करीत आहेत. तुकाराम मुंढे साहेब यांनी आरोग्य विभागाकडे गांभीर्याने लक्ष देत अनेक गोष्टींकडे बारीक लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. तरी देखील रुग्णालयात डॉक्टर वेळेत उपस्थित न राहिल्याने मुंडे साहेबांनी रत्नागिरीकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
फुंणगुस पंचक्रोशीसाठी हे हॉस्पिटल महत्त्वाचे असल्याने कोंड्ये, पंरचुरी, डिंगणी, लांवगण, डांवखोल आदी भागातून लोक येथे येत असतात. यांची गैरसोय होत आहे.
प्रत्यक्ष डॉक्टर उपस्थित राहण्याची वेळ सकाळी ८:३० असून 10 वाजले तरी डॉक्टर उपस्थित राहत नसल्याचे आज उपस्थित रुग्णांनी सांगितले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाहीत तसेच येथे काम करणारे इतर आरोग्य कर्मचारी यांची देखील कमतरता असल्याने रुग्णांची गैरसोया होत आहेत.
दखल न्यूज महाराष्ट्र.