चिपळूण : गोवळकोट एज्युकेशन सोसायटी,खदिजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल,गोवळकोट या विद्यालयातील विद्यार्थीनीची जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सदर स्पर्धेसाठी एकूण ६२ विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेसाठी सहभाग नोंदवला होता.यातून गोवळकोट एज्युकेशन सोसायटी, खदीजा इंग्लिश मिडीयम स्कुल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कुल ची कु.जुवेरीया इम्रान खतीब हिने जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. एकूण 1500 शब्द मर्यादा असलेल्या निबंधामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कार्य याविषयी सदर निबंधलेखन केले आहे.यासाठी मार्गदर्शक शिक्षक व विद्यालयाचे सहा. शिक्षक श्री.योगेश पेढांबकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटी विद्यमान चेअरमन श्री.डॉ.इसहाक खतीब ,व्हा.चेअरमन श्री.जफर कटमाले,मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरुसा खतीब,संस्थेचे विद्यमान सेक्रेटरी श्री.मुजाहिद मेयर ,संस्थेच्या विद्यमान सल्लागार सौ.नादिया खतीब, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.खुर्शीद शेख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल गोवळकोट परिसरातुन विशेष अभिनंदन वर्षाव करण्यात येत आहे.