बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी..

दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. ९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबत आज सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या विषयावरील सुनावणी रखडली होती. मात्र, आज होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे.
           महाराष्ट्रातील अनेक नगरपरिषदा, महानगरपालिका यामध्ये प्रशासन नियुक्त करण्यात आले आहे. वेगवेगळ्या कारणामुळे रखडलेल्या निवडणुकांचे काय होणार? याबाबत आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्रातील ९२ नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही यावर सर्वोच्च न्यायालयात २३ ऑगस्ट रोजी शेवटची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने स्थिती जैसे थे ठेवत ओबीसी आरक्षणावरील सुनावणी ५ आठवड्यांनी पुढे ढकलली होती. सोबतच सुनावणीसाठी विशेष खंडपीठाची स्थापना करणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आधीच्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे तसेच राज्यातील ९२ नगर परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावे, अशी मागणी करणारी याचिका शिंदे-फडणवीस सरकारने केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण स्थगित ठेवण्याचा आदेश दिला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार असून नगरपरिषदांच्या निवडणुकीचे काय होणार? ओबीसी आरक्षण असणार का? हे आज ठरणार आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

🩺 जाहिरात..🩺
▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!