ब्रिटन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे. भारतीय वंशाचे पंतप्रधान ब्रिटनला मिळणे ही पहिलीच वेळ आहे. राजकीय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी त्यांच्या स्वतःच्या काही फायनान्स कंपनी होत्या. 2014 साली पहिल्यांदा खाजदार झाले. या निवडणुकीत ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डोंटचा पराभव करून विजय मिळवला आहे. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ 185 हून अधिक खासदार आहेत. तर पेनी मॉर्डंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात; आणि 29 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते.
दखल न्यूज महाराष्ट्र.









