बातम्या

पाचल येथे “संविधान संवाद” पथनाट्याच्या माध्यमातून जागृती.

राजापूर : पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या,सरस्वती विद्या मंदिर, व कनिष्ठ महाविद्यालयात  आज, उद्याच्या संविधान दिनाचे औचित्य साधून, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय लांजा व राष्ट्रीय सेवा योजना विभाग माजी विद्यार्थी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि यांच्या माद्यमातून 21 नोव्हेंबर ते 26नोव्हेंबर या कालावधीमध्ये राजापूर आणि लांजा तालुक्यातील काही शाळांमध्ये संविधान संवाद सप्ताह साजरा करण्यात येत आहे. हा संविधान संवाद सप्ताह  21 तारखेपासून लांजा आणि राजापूर तालुक्यातील पूर्व भागातील जवळपास 17 ते 18 शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर  जाऊन विद्यार्थ्यांसोबत  संवाद करून संविधान नेमक्या शब्दांमध्ये सांगायचा प्रयत्न करण्यात येतं आहे.भाषणं ही पुष्कळ वेळा होतात व ती एकतर्फी होतात म्हणून पथनाट्याच्या माध्यमातून एक जागृती करावी आणि रोजच्या जगण्याचं मूल्य आणि तत्त्व  हे संविधानात कसं आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, समजावून सांगावं हा या मागचा हेतू आणि  मुख्य उद्देश आहे,असे मतं या उपक्रमाचे प्रमुख रत्नागिरी जिल्हा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुंबई विद्यापीठाचे जिल्हा समन्वय म्हणून कामं करतं असणारे डॉक्टर राहूल मराठे यांनी यावेळी व्यक्त केलं.
                मागच्या तीन दिवसापासून आम्ही, विद्यार्थी आणि समाज्यामध्ये जनजागृती करायला सुरवात केली असून आज आम्ही पाचल मध्ये तसेच पाचल च्या पूर्व पश्चिम भागामध्ये या ठिकाणी प्रबोधन करणार आहोत आणि यासाठी आम्हांला श्री मनोहर खापणे महाविद्यालयाचे, तसेच सरस्वती विद्या मंदिर च्या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे असेही ते म्हणाले,
             डॉक्टर राहुल मराठे लांजा येथे  सध्या एनएसएस चा विभाग सांभाळत आहेत. त्यांचे सहकारी धनश्री बावस्कर मॅडम, प्राची बामणे मॅडम,विशाखा पावस्कर मॅडम,या सर्वांनी पथनाट्य  बसविण्यात त्यांना मोलाचं सहकार्य केलं आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!