२९ नोव्हेंबर पासून ३ वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षा सुरू होणार असून या परीक्षेचा परीक्षा अर्ज भरण्यात येणाऱ्या अडचणी बाबत अभाविप ने विद्यापीठाला वारंवार निदर्शनास आणून देखील परीक्षा विभागाने घालायचा तो गोंधळ घातला असून परीक्षा उद्यावर येऊन ठेपल्या असताना अजून देखील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध झाले नाही .महाविद्यालयासोबत संपर्क केला असता संध्याकाळ पर्यंत हॉल तिकीट उपलब्ध होतील असे सांगण्यात येत आहे .त्यामुळे उद्या परीक्षेला जाताना नेमक्या कुठल्या परीक्षा केंद्रावर परीक्षेला जायचे याबाबत अजूनही विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. तसेच परीक्षेला जायच्या अगोदर हॉल तिकीट वर प्राचार्यांचा शिक्का व सही घेणे आवश्यक असते त्यामुळे उद्या महाविद्यालयात जाऊन सही शिक्का घ्यायचा की वेळेत परीक्षा केंद्रवार पोहचायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे ? परीक्षा विभागाच्या कायमच्या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना फार मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे .
अभाविप चे कोंकण प्रदेशमंत्री अमित ढोमसे म्हणाले की ” परीक्षा विभागाचा सावळा कारभार असाच सुरू राहिला तर परीक्षा विभागाला टाळे ठोकून अभाविप तर्फे आंदोलन करण्यात येईल .तसेच उद्याच्या होणाऱ्या परीक्षेमध्ये विद्यापीठाच्या सावळ्या गोंधळामुळे कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी विद्यापीठ प्रशासनाने घ्यावी. उद्या पासून सुरू होणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना कुठलीही अडचणी आली तर विद्यार्थ्यांनी अभाविप च्या +९१- ८४२४० ०९७४९, +९१- ७४१५३ १७७९३ या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.
( सदरील प्रसिद्धी पत्रक हे कोंकण प्रदेश कार्यालय मंत्री शुभम खरात यांनी मुंबई येथून प्रसिद्धीस दिले आहे. )
*दखल न्यूज महाराष्ट्र.*