चिपळूण : (ओंकार रेळेकर ) युवासेना शहर च्या वतीने शहरात अनधिकृत ठिकाणी मद्य सेवन आणि आमली पदार्थ विकणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी म्हणून चिपळूण पोलीस स्टेशनला मंगळवारी निवेदन देण्यात आले. विविध मैदानी खेळासाठी प्रासिध्द असलेल्या पवन तलाव मैदान तसेच इंदीरा गांधी सांस्कृतिक केंद् यांच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मद्य सेवन व आमली पदार्थ सेवन करणाऱ्या टोळ्या दिसून येत आहेत
सदर भागात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या आणि सिगरेट पाकिटे दिसून आली आहेत याची दखल घेत आज युवासेना शहर च्या वतीने चिपळून पोलीस स्टेशन येथे पोलीस निरिक्षक श्री. रवींद्र शिंदे ,यांची भेट घेत अशा मानसिक विकृती करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे उद्योग होत असतील तर त्या बेशिस्त लोकांन वर,कारवाई करण्यात यावी असे निवेदन आज युवासेनेच्या वतीने देण्यात आले
यावेळी युवासेना तालुका प्रमुख उमेश खताते,युवासेना शहर प्रमूख पार्थ जागुष्ठे,युवासेना तालुका सचिव प्रतिक शिंदे,उपतालुका प्रमुख प्रितम वंजारे,ऋषिकेश नलावडे,उपशहर प्रमुख आकाश कदम,विनोद पिल्ले,विनायक रेडिजा,ओमंकार गायकवाड,विभाग प्रमूख साहिल शिर्के, विनीत शिंदे,मोहम्मद अली,आर्यन हरवंदे,आदि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : युवासेनेतर्फे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांना निवेदन देताना तालुका प्रमुख उमेश खताते,युवासेना शहर प्रमूख पार्थ जागुष्ठे,युवासेना तालुका सचिव प्रतिक शिंदे,उपतालुका प्रमुख प्रितम वंजारे,ऋषिकेश नलावडे,उपशहर प्रमुख आकाश कदम,विनोद पिल्ले,विनायक रेडिजा,ओमंकार गायकवाड,विभाग प्रमूख साहिल शिर्के, विनीत शिंदे,मोहम्मद अली,आर्यन हरवंदे छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)