चिपळूण : (ओंकार रेळेकर ) नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातर्फे दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी एक दिवशीय ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा.डॉ.अनिल सत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांची ओळख, अभ्यासक्रम ,आवश्यक पुस्तके, नियोजन या विविध विषयावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली.सौ.दिपाली चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना स्वत:च्या परीक्षांचे अनुभव, निवड प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांमध्ये असलेल्या नोकरीच्या संधी याविषयी चर्चा केली. श्री दत्ताराम सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना “वनविभाग आणि त्यातील नोकरीच्या संधी” याविषयी मार्गदर्शन केले. कोकणामध्ये स्पर्धा परीक्षांबाबत अधिक प्रसार होणे आवश्यक असल्याचे असे मत अॅड.श्री जीवन रेळेकर यांनी व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.एम.एस.चांदा यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा.डॉ.यु.डी. सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. एस के नामदास यांनी केले. यावेळी प्रा.सौ.ए.व्ही. जोशी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सिद्धी चाळके या विद्यार्थिनीने केले. या कार्यशाळेचा लाभ महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी घेतला. दखल न्यूज महाराष्ट्र