प्रतिनिधी : राम भोस्तेकर माणगाव
रायगड : महाड़ एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजे महाड एम.आय.डी.सी. येथील जुहारी कंपनीतील रस्त्यावर दि. ३१ डिसेंबर २०१८ रोजी रात्री ०१.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, घटनेतील आरोपीत शिवपती सुभोगलाल पटेल कंटेनरचालक यांनी आपले ताब्यातील कंटेनर क. एम.एच. ४६/ बीबी ५४८२ हा दारू पिवून चालवून यांतील फिर्यादी भारत मोहन कदम यांचे अंगावर कंटेनर घालून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून यांतील मयत सुर्यकांत उर्फ सुरेश गणपत कालगुडे यांच्या अंगावर कंटेनर घालून त्यात त्यांना गंभीर. दुखापत होवून त्यास ठार मारले.
सदर घटनेची फिर्याद पोलीसानी भा.द.वि.सं. कलम ३०२, ३०७ अन्वये घेऊन गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयाचा तपास सहा. पो. नि. महाड ए. ए. पाटिल, एम.आय.डी.सी. पोलिस ठाणे यांनी केला. सदर खटल्याची सुनावणी मा. अति. सत्र न्यायाल माणगांव- रायगड येथे झाली. सदर खटल्यामध्ये अति. जिल्हा शासकिय अभियोक्ता जितेंद्र डी. म्हात्रे यांनी फिर्यादी पक्षाच्या वतीने महत्वपूर्ण काम पाहिले. सदर केसकामी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासण्यात आले. प्रभावी युक्तिवाद करतांना सरकारी वकील अॅड. जितेंद्र म्हात्रे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेले न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी यु.एल. धुमास्कर, पो. ह. शशिकांत कासार, छाया कोपनर, शशिकांत गोविलकर यांनी सहकार्य केले. मा. टी. एम. जहांगिरदार, अति सत्र न्यायाधिश, माणगांव यांनी सदर घटनेतील गुन्हयाच्या शाबीतीनंतर आरोपी शिवपती सुभोगलाल पटेल या आरोपींना दोषी ठरवून दि. ०२ डिसेंबर २०२२ रोजी भा.द.वि.क. ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व रु. २०,०००/- दंड व दंड न भरल्यास १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, भा.द.वि.क. ३०७ अन्वये १० वर्ष सक्तमजूरी व रू. ५०००/- दंड व दंड न ल्यास १ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.