त्या अपक्ष उमेदवाराचा जोरदार प्रचार सुरू.. त्याचीच सर्वत्र चर्चा…
लांजा : लांजा तालुक्यातील खानावली ग्रामपंचायतीची निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येत आहे तस तशी शिवसेना पुरस्कृत आणि भाजप पुरस्कृत दोन्ही पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेनेने निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले मात्र भारतीय जनता पार्टी या गावांमध्ये निवडणूक लढत असल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. प्रचारात दोनही पॅनेलने जोरदार मुसंडी मारली असून नऊ सदस्य असलेल्या खानावली ग्रामपंचायतीत कोणताही प्रभाग बिनविरोध होऊ शकला नाही.
सरपंच पदाच्या रस्सीखेच मध्ये एकूण चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले एका उमेदवाराने माघार घेत ठाकरे गट शिवसेनेला पाठिंबा दिला. तर प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात सरपंच पदासाठी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप असे तीन उमेदवार मैदानात आहेत. आणि या तीनही उमेदवारांमध्ये जोरदार लढत होणार असल्याची चिन्हे आहेत.
भारतीय जनता पक्षाने सर्व प्रभागात उमेदवार दिल्याने ही निवडणूक अधिक चुरशीची झाली आहे. भाजप पुरस्कृत पॅनल मधून प्रभाग क्रमांक तीन मध्ये भारतीय जनता पक्षाने दिलेला उमेदवार अचानक एका रात्रीत पॅनल मधून गायब करत अपक्ष उमेदवारास पॅनलमध्ये घेतल्याने गावामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपाने असे का केले असा सवाल गावकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. सरपंच पदाच्या खुर्चीच्या गणितासाठी ही सगळी धडपड असल्याचे बोलले जात आहे. पॅनल मधून बाहेर केलेल्या उमेदवाराला देखील आजपर्यंत याबाबत कल्पना दिली नसल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील या उमेदवाराला अचानकपणे थांबवल्यामुळे या उमेदवारावर अन्याय झाल्याची भावना देखील जनमानसात आहे. आणि याची सहानुभूती देखील या उमेदवारास मिळत आहे. तर अन्य पक्षातील लोक देखील या व्यक्तीशी संपर्क साधून आम्ही तुझ्याबरोबर आहोत असा दिलासा देताना दिसत आहेत. तर भाजपाचा एक वरिष्ठ पदाधिकारी देखील या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन मधील या उमेदवाराच्या लढतीकडे देखील संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रभाग क्र.१ते ३ नऊ जागांसाठी तब्बल एकोणीस उमेदवार सदस्य पदासाठी रिगणात उतरले आहेत, तर थेट जनतेतून सरपंच निवडीसाठी तीन उमेदवार रिंगणात असून एकूण २१ उमेदवार आपले भवितव्य आजमावत असून सर्वच पॅनलने प्रचारात आघाडी घेतली असून या अपक्ष उमेदवाराचे पारडे जड होणार का? लोकांची सहानुभूती घेऊन हा उमेदवार विजयी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अपक्ष उमेदवाराने देखील शांततेच्या मार्गाने अतिशय वेगाने प्रचारात मुसंडी मारली आहे. प्रत्येकाशी वैयक्तिक संपर्क ठेवत प्रचार करीत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र

सार्वत्रिक निवडणूक 2012.
▶️ ग्रामपंचायत वाघ्रट – वाडिलिंबू सरपंच पदाचे उमेदवार प्रथमेश गोरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा….
निशाणी : ‘नारळ’.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र…