अलिबाग : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) साडेचार तास चौकशी केली. एसीबीने राजन साळवी यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार ते अलिबाग कार्यालयात बुधवारी चौकशीसाठी हजर झाले. एसीबीच्या अलिबाग कार्यालयात सकाळी ११ वाजता त्यांची चौकशी सुरु झाली. साडेचार वाजता चौकशी पूर्ण झाली. यावेळी एसीबी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे.माझ्यासोबत शिवसेना आहे. ही नोटीस जाणीवपूर्वक पाठवण्यात आली आहे. नोटीस अशीच येत नाही. यामागे शिंदे-फडणवीस सरकार आहे, असा आरोप साळवी यांनी केला. त्यानंतर ते चौकशीसाठी कार्यालयात गेले. तब्बल चार तासांनी साळवी यांची चौकशी पूर्ण झाली. ते कार्यालयाबाहेर आले. कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यानी एकच जल्लाेष केला. माझ्यासाठी रत्नागिरीतून कार्यकर्ते आले. रायगड जिल्ह्यातूनही कार्यकर्ते आले, याचे मला समाधान व आनंद आहे. या सर्व कार्यकर्त्याचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली.
दखल न्यूज महाराष्ट्र