रत्नागिरी प्रतिनीधी : प्रसाद गांधी.
रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यापासून काही अंतरावर असणारे वडगाव खुर्द व वडगाव बुद्रुक तसेच रायगड जिल्ह्यातील पोलादपुर तालुक्यातील कोतवालबुद्रुक ही गावे विकासाच्या द्रृष्टिने वंचीत राहीलेली आहेत , प्रशासनाने विकासाच्या द्रुष्टीने लक्ष द्यावे म्हणुन वडगाव गावचे ग्रामस्थ अटीतटीचे प्रयत्न करीत आहेत, त्यातच भर म्हणुन वडगावचे श्री. चंद्रकांत मोरे यांनी सार्वजनीक बांधकाम मंत्री मा. रवींद्र चव्हाण यांना निवेदन दीले आहे.
याचे सव्वीस्तर वृत्त असे की, वडगाव ते कोतवालबुद्रुक हा नवा रस्ता व्हावा यासाठी गावक-यांचे शरतीचे प्रयत्न चालु आहेत वडगाव हे गाव रसाळगड, प्रतापगड, महीपतगड, सुमारगड या पर्यटन स्थळांच्या कुशीत वसलेले गाव असुन हा रस्ता पुर्ण झाल्यास वरील सर्व पर्यटन स्थळापर्यंत जाण्यास सोईचे होईल व परीसरातील सुशीक्षीत बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मीळण्यास मदत होईल, तसेच वडगाव ते पोलादपुर हा मार्ग दळणवळणासाठी सोईचा ठरेल, या सर्व गोष्टींचा वीचार करुन वडगाव ग्रामस्थांनी बांधकाम मंत्री यांना निवेदन देण्यात आले असुन सदर रस्त्याला मंजुरी मीळेल याकडे वडगाव ग्रामस्थांचे लक्ष लागुन आहे.