बातम्या

वाघाच्या कातडीची तस्करी करणारे तिघेजण ताब्यात; चिपळूण वनविभाग व दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई.

चिपळूण- पूर्ण वाढीच्या पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना चिपळूण वनविभाग व दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी (३० डिसेंबर) सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घोणसरे (ता. चिपळूण) येथील चिवेली फाटा येथे करण्यात आली.

▶️ जाहिरात…
▶️ भाजपा अल्पसंख्याक मोर्चा रत्नागिरी शहर उपाध्यक्ष श्री. मन्सूर मुकादम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
▶️ शुभेच्छुक : भाजपा अल्पसंख्याक मोर्चा रत्नागिरी शहर.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र….


           रामपूर नियत क्षेत्रातील घोणसरे येथील चिवेली फाटा येथे काहीजण वन्यप्राण्याची कातडी अवैध तस्करी व विक्रीच्या उद्देशाने घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे वन विभाग व दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचला होता. त्याठिकाणी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान संशयितरित्या वावरणाऱ्या तिघांकडे चौकशी केली. त्यांच्याकडे असणाऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये पट्टेरी वाघाचे कातडे मिळाले. या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डाँ. धनजंय कुलकर्णी, विभागीय वनअधिकारी दिपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या संयुक्त कार्यवाहीमध्ये दहशतवाद विरोधी पथकाकडून पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. नरवणे, वनपाल डी. आर भोसले, गुहागरचे वनपाल एस. व्ही. परशेट्ये, रामपूरचे वनरक्षक शिंदे, आबलोलीचे वनरक्षक डुंडगे, रानवी वनरक्षक मांडवकर यांच्यासह दहशतवाद विराेधी पथकाच्या अंमलदारांनी सहभाग घेतला हाेता.
दखल न्यूज महाराष्ट्र..

▶️ रत्नागिरी येथील चितळे नर्सिंग होम येथे..
▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर  उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया व सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
      चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!