रत्नागिरी : शहरातील काँग्रेसभुवन रोडवरील प्रमोद महाजन कीडा संकुलासमोरील फुटपाथवर दारु पिऊन मद्यधुंद अवस्थेत सापडलेल्या 5 तरुणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ष अखेर आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने पोलीस कारवाईसाठी सज्ज होते. पोलीस विभागाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी सूचना देखील जाहीर करण्यात आल्या होत्या तरी देखील उत्साहाच्या भरात अनेकांकडून नियमांची पायमल्ली केली दिसून आली.
रत्नागिरी शहरातील काही तरुण मध्य धुंद अवस्थेत सापडले त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. सुशांत सुनील जोशी (36, झाडगाव, मुरुगवाडा, रत्नागिरी), बिपीन ईश्वरलाल टुकडीया (40, भडंग तिठा, मांडवी), आदित्य मिलींद भाटकर (26, भाट्ये, महाजन वाडी), इशांत दीपक नागवेकर (38, मुरुगवाडा, कावळेवाडी, रत्नागिरी), जुबेर निसार निशानदार (39, पठाणवाडी, भगवतीबंदर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 5 जणांची नावे आहेत.
रत्नागिरी येथील चितळे नर्सिंग होम येथे.. 100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी.. ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त.. कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी.. 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत. 8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली. हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत. काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले. बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार. पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी. अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया व सल्ला. डॉ. मिहीर चितळे. चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी. संपर्क : 7263096801