चिपळूण : (ओंकार रेळेकर ) शिवसेना ग्राहक संरक्षणाच्या कामकाजाबाबत ऐकून होतो.. मात्र आज अनुभव घेतला आणि खरंच प्रभावित झालो अशी प्रतिक्रिया शहरातील मिठाई व्यावसायिक विक्रम चव्हाण ह्यांनी व्यक्त केली.चव्हाण ह्यानी काही महिन्यांपूर्वी सॅमसंग कंपनीचा महागडा मोबाईल विकत घेतला होता मात्र काही दिवसातच तो मोबाईल बिघडला मुदत कालावधीत असल्याने कंपनीच्या सेवाकेंद्राकडे ह्याबाबत संपर्क साधला असता केंद्राने चव्हाण ह्यांना सदरचा मोबाईल निशुल्क सेवेत देता येणार नाही असे सांगत चव्हाण ह्यांना टाळण्याचा प्रयत्न केला.वॉरंटी मुदतीत असूनही निशुल्क सेवा देण्यास नकार देणाऱ्या सॅमसंग सेवाकेंद्राच्या विरोधात चव्हाण ह्यांनी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षकडे तक्रार दिल्यानंतर ग्राहक कक्षच्या पदाधिकऱ्यांनी संबंधित सेवा केंद्राच्या संचालकांशी चर्चा करून पाठपुरावा केल्यानंतर कंपनीच्या वतीने सेवा केंद्राकडून चव्हाण ह्यांचा मोबाईल निशुल्क दुरुस्त करून देण्यात आला.. ग्राहक संरक्षण कक्षच्या सहकाऱ्यामुळे माझे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान वाचले..मी ग्राहक संरक्षण कक्षच्या सर्व पदाधिकऱ्यांचा आभारी आहे आजपर्यंत मी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षच्या कामकाजाबद्दल ऐकून होतो पण आज अनुभव घेतला स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांचा समाजकारणाचा वारसा ग्राहक संरक्षण कक्षच्या पदाधिकारी समर्थपणे जपत आहेत.अशी प्रतिक्रिया चव्हाण ह्यानी व्यक्त केली. ह्यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, तालुकाप्रमुख सूरज कदम,शहरप्रमुख उमेश गुरव,उपतालुकाप्रमुख विजय जाधव,सुशांत पवार,कक्षविभागप्रमुख महेंद्र आमरे,सौरभ फागे,अजित पवार,अनिल राक्षे,उपविभागप्रमुख राहुल पवार,प्रसाद कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : शिवसेना ग्राहक सवरक्षण विभाग पदाधिकारी यांच्याकडे निवेदन देताना विक्रम चव्हाण या वेळी
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख संतोष सुर्वे, तालुकाप्रमुख सूरज कदम,शहरप्रमुख उमेश गुरव,उपतालुकाप्रमुख विजय जाधव,सुशांत पवार,कक्षविभागप्रमुख महेंद्र आमरे,सौरभ फागे,अजित पवार,अनिल राक्षे,उपविभागप्रमुख राहुल पवार,प्रसाद कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.(छाया : ओंकार रेळेकर)
