देवरुखची
: ग्रामदेवता श्री सोळजाई मंदिरामध्ये हनुमान प्रासादिक बालमित्र समाज मंडळ, देवरुख-खालची आळी येथील येथील युवकांनी साकारलेल्या रांगोळ्या भक्तांच्या व कला रसीकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहेत. गेली अनेक वर्ष खालची आळी, देवरुख येथील रांगोळी कलाकार अभ्यंगस्नानाच्या मंगलदिनी विविध आकर्षक विषयावर रांगोळ्या साकारतात.

यावर्षीच्या रांगोळी प्रदर्शनाची संकल्पना श्री गणेशांची विविध रूपे ही आहे. गेली अनेक वर्ष स्वयंस्फूर्तीने रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या या युवकांचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. श्री गणेशांच्या विविध रूपांवर आधारित या रांगोळ्या प्रा. संदीप पवार, मंगेश नलावडे, रांगोळीमधील विश्व विक्रमवीर विलास रहाटे, अक्षय वहाळकर, सार्थक नलावडे, शिवम नलावडे त्याचबरोबर संस्कारभारतीची भली मोठी रांगोळी पल्लवी, वैभवी, ममता, रुचिरा या पवार भगिनींनी आणि संदीप साळवी यांनी रेखाटली आहे. देवरुख मधील प्रतीथयश कलाकारांनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाला अनेक रसिक भेट देत आहेत.
फोटो- श्री गणेशांची विविध रूपे या संकल्पनेवर आधारित रांगोळ्यांचा कोलाज.
छाया- किरण चाचे.



