रत्नागिरी : रत्नागिरीतील सुकन्या आणि संगीत सह्याद्रीच्या नाट्य विभाग अध्यक्षा गुणी नाट्य सिनेअभिनेत्री पूजा ताई जोशी यांची छोटी कन्या कस्तुरी जोशी हिला कोल्हापूर येथील A.B.R.K फिल्म प्रोडक्शनच्या वतीने दिला जाणारा राज्य स्तरीय आदर्श कलारत्न पुरस्काराने कोल्हापूर येथे सन्मानित करण्यात येणार आहे. नाट्य अभिनेत्री पूजा ताई जोशी यांच्या बरोबर अभिनयाचे धडे गिरवत असतानाच कस्तुरीला उपजतच नृत्याची आवड असल्यामुळे ती या क्षेत्राकडे ओढली गेली . तिची ही आवड लक्षात घेवून पूजा ताई यांनी तिला काही काळ नृत्याचे धडे गिरवण्यासाठी कोल्हापूर येथे पाठवली आणि तिथेच तिने आपल्या करियर ची सुरुवात केली आणि आज तिच्या या यशाचं कौतुक करावं आणि अभिमान वाटावा असा हा पुरस्कार आणि या पुरस्काराने रत्ननगरीच नाव सुवर्णाक्षरांनी लिहण्याचा मान कस्तुरी हिने पटकावला . सर्व स्तरातून कस्तुरी हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . स्वराज्य प्रतिष्ठान लांजा परिवाराच्या वतीने कस्तुरी हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा .
दखल न्यूज महाराष्ट्र
