रत्नागिरी : संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. करोडो रुपयाची गुंतवणूक, उलाढाल मासेमारी व्यवसायामध्ये होत असते. साधारणपणे नारळी पौर्णिमेनंतर मच्छीमारी व्यवसायाला सुरुवात होते. यंदा देखील पारंपारिक आणि पर्ससीननेट मासेमारी सुरुवात झाली आहे. मात्र वातावरणामध्ये होणारे सतत बदल याचा परिणाम म्हणून की काय पण गेले अनेक दिवस मासेमारी हा व्यवसाय काहीसा थंडावला आहे.

समुद्रकिनारी किंवा खोल समुद्रात जाऊन देखील मासे मिळत नसल्यामुळे मच्छीमारांसमोर आर्थिक संकट येऊन ठेपले आहे. वादळ सदृश्य परिस्थिती आणि वातावरणातील बदल लांबलेला पाऊस या सर्वाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झालेला दिसून येत आहे.
करोडो रुपयांची उलाढाल असलेला हा व्यवसाय परकीय चलन मिळवून देण्यास देखील पूरक असतो. मासेमारी करायला गेलेल्या बोटी अनेकदा रिकामेच परत येताना दिसत आहेत. अपेक्षेप्रमाणे मच्छी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम निर्यातीवरही देखील झालेला आहे. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर मच्छिमार अधिक आर्थिक अडचणीत येऊ शकतो.
दखल न्यूज महाराष्ट्र.

