बातम्या

समाजसेवक मा.श्री. विश्वासदादा भालेराव यांच्या सौजन्याने, जय भोळे चाल मित्रमंडळ दिवा आयोजित दिवा नगरीत होणार अविअनील कलामंच यांच्या नमन कार्यक्रमाचे सादरीकरण.


प्रतिनिधी : अक्षय कदम

मुंबई : दि.१२ फेब्रुवारी २०२३रोजी सायंकाळी ७:३०वा. आगासन फाटक,मानपाडा रोड, पाण्याच्या टाकी जवळ,दिवा पूर्व येथे होणार आहे.
नमनात स्त्रिपात्राने नटलेल्या पारंपरिक गण ,आणि फुल टू धम्माल गौळणीसह ज्वलंत नाट्यकृती “अजिंक्य योद्धा अर्थात शिवाचा छावा शंभूराजा”
ही नाट्यकृती सादर होणार आहे.
लेखक/दिग्दर्शक : अविनाश गराटे.गीते /गायक आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका :शाहीर अनिल गराटे.आणि क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका दिग्गज सिनेअभिनेते मा.श्री. सुनीलजी गोडबोले सर.
गायिका प्रीती भोवड वीर /अनिशा अनिल गराटे, गायक – शैलेश कुवार यांच्या सुमधुर आवाजात होणार सादरीकरण
कार्यक्रमाला माजी उपमहापौर, दिवा शहर प्रमुख,नगर सेवक मा.श्री. रमाकांतजी दशरथ मढवी साहेब व शाखा प्रमुख तिसाई दिवा चे मा.श्री.निलेश रोहिदास म्हात्रे साहेब,नगर सेविका मा.सौ.दर्शना चरणदास म्हात्रे व मोठमोठे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, तरी आपनही सर्वांनी सह कुटुंब सह परिवारा सोबत कार्यक्रम पहाण्याचा आनंद घ्यावा, अशी विनंती जय भोळे चाळ मित्र मंडळ दिवा चे श्री.विलास दुर्गवळी, राजेंद्र जावळे,मंगेश धनावडे,रमेश हतपले,प्रशांत कदम,व आदींनी विनंती केली आहे. कार्यक्रमासाठी संपर्क:९५९४९४७९१२/९७०२१३७७८०/९६१९६५८५६१. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!