प्रतिनिधी : राम भोस्तेकर.
माणगांव : टीडब्लूजे (ट्रेड विथ जाझ) आणि सह्याद्री स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन, माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी “सह्याद्री मॅरेथॉन २०२३” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेला “महाराष्ट्र केसरी २०२३” शिवराज राक्षे यांची उपस्थिती खास आकर्षण ठरली.
टी.डब्लू.जे माणगांव शाखा व्यवस्थापक मुनाफ मुकादम यांनी स्पर्धेबाबत माहिती देताना ही स्पर्धा आरोग्य, व्यायाम, क्रीडाप्रकार याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, व्यायामाचे महत्त्व नागरिकांना समजावे यासाठी “सह्याद्री मॅरेथॉन २०२३” स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगितले.
स्पर्धेसाठी ७ गट तयार करण्यात आले होते. १४ वर्षापर्यंत मुला मुलींना ३ किलोमीटर अंतर, १७ वर्षापर्यंत मुला मुलींना ५ किलोमीटर, महिला व पुरुष खुला गट १० किलोमीटर, आणि ४५ वर्षा पेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तीस ड्रीम रन २ किलोमीटर अशी विभागणी करण्यात आली होती विविध गटात पहिल्या सहा येणाऱ्या विजेत्यांना रोख बक्षीसासह सन्मानपदक व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र आणि टी शर्ट देण्यात आले.

मॅरेथॉन स्पर्धेत विजयी झालेले स्पर्धक
१४ वर्षाखालील मुली (अंतर-३ की. मी.)
प्रथम क्र.- मयुरी नितीन चव्हाण, उरण
द्वितीय क्र.- पूजा तुकाराम सावंत, महाड
तृतीय क्र.- वैष्णवी विशाल पाटिल, अलिबाग
चतुर्थ क्र.- भूमी अक्षय म्हात्रे, अलिबाग
पाचवा क्र.- शामला सतिश शिगवण, उसर
सहावा क्र.- स्नेहा सचिन अंबरले, उसर
१४ वर्षाखालील मुले (अंतर-३ की. मी.)
प्रथम क्र.- कार्तिक भिसुरे, पनवेल
द्वितीय क्र.- समर्थ येरूनकर, उसर
तृतीय क्र.- कुशल म्हात्रे, उसर
चतुर्थ क्र.- हर्ष तांबे, उसर
पाचवा क्र.- ऋतूराज राणे, महाड
सहावा क्र.- चंदन शेलार, महाड
१७ वर्षाखालील मुली (अंतर-५ की. मी.)
प्रथम क्र.- देविका सोनवणे, पनवेल
द्वितीय क्र.- कथा वाडकर,अलिबाग
तृतीय क्र.- आर्या वाडकर, अलिबाग
चतुर्थ क्र.- रविना मोरे, माणगांव
पाचवा क्र.- अर्चना ढाकवल, माणगांव
सहावा क्र.- मानवी केकाणे, माणगांव
१७ वर्षाखालील मुले (अंतर-५ की. मी.)
प्रथम क्र.- सोहम मोकल
द्वितीय क्र.- रामदास जाधव
तृतीय क्र.- विपुल मोकल
चतुर्थ क्र.- संजोग म्हात्रे
पाचवा क्र.- शंतनू भुवड
सहावा क्र.- प्रज्योत कदम
महिला खुला गट (अंतर-१० की. मी.)
प्रथम क्र.- गायत्री पाटील, रसायनी
द्वितीय क्र.- सुप्रिया माळी, उरण
तृतीय क्र.- अमिशा भिसे
चतुर्थ क्र.- दर्शना पाटील, अलिबाग
पाचवा क्र.- नेहा म्हात्रे
सहावा क्र.- स्वप्नाली म्हात्रे, पेण
पुरुष खुला गट (अंतर-१० की. मी.)
प्रथम क्र.- लक्ष्मण दरवाडा, खोपोली
द्वितीय क्र.- करण माळी, उरण
तृतीय क्र.- रामू पारधी, नागोठणे
चतुर्थ क्र.- अमित पाटील, उरण
पाचवा क्र.- प्रेम ठाकूर
सहावा क्र.- चिंतामणी शिगवण
ड्रिम रन
प्रथम क्र.- नथु गणपत पवार, महाड
द्वितीय क्र.- हर्षद दिलीप वेदक, तळा
तृतीय क्र.- विजय रामचंद्र खांबे, महाड
चतुर्थ क्र.- राजेंद्र चंद्रकांत भगत, माणगांव.
दखल न्यूज महाराष्ट्र.
