बातम्या

२३ एप्रिल रोजी चिपळूण नागरी पतसंस्थेचां संकल्पपुर्ती आनंद मेळावा..

चिपळूण (ओंकार रेळेकर)चिपळूण नागरी पतसंस्थेचा २३ एप्रिल रोजी संकल्पपुर्ती आनंद मेळावा व ग्राहक मेळावा संस्थेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये निश्चीत केलेली उद्दिष्ट पूर्ण केल्याने दि. २३ एप्रिल रोजी संकल्पपुर्ती आनंद मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या बहादुरशेखनाका चिपळूण येथील सहकार भवन मध्ये सकाळी ठिक १०.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याला मा. श्री. एस. बी. पाटील साहेब, निवृत्त अप्पर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोदयोग मंत्रालय, मुंबई व मा. श्री. डॉ. सोपान शिंदे साहेब, जिल्हा उपनिबंधक सह. संस्था, रत्नागिरी हे उपस्थित राहणार आहेत. सस्थेने ३० वा वर्धापन दिन १००० कोटींचा टप्पा या आर्थिक वर्षात पूर्ण केला हा टप्पा पूर्ण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाषराव चव्हाण, मुख्यकार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना प्रशांत यादव यांच्या नियोजनानुसार सर्व सभासद, ग्राहक, कर्मचारी यांच्या अपार मेहनत व सहकार्याने माहे सप्टेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२२ या तिमाहीमध्ये एकुण ठेवीमध्ये ६७ कोटी ७६ लाख वाढ करुन सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकुण १२७ कोटीने ठेवी व ८० कोटीनी कर्जव्यवहार वाढीची ३० वर्षाच्या कालखंडातील विक्रमी वाढ झाली. संस्थेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या उपक्रमात सहभागी होऊन १५ ऑगस्ट रोजी सर्व शाखांवर ध्वजवंदन केले तसेच या वर्षी “राष्ट्र अमृतवर्ष” साजरे करत असताना संस्थेने “राष्ट्र
अमृतमहोत्सव” मासिक ठेव व “राष्ट्र अमृतमहोत्सव” मुदत ठेव या दोन ठेव योजना कार्यान्वीत करून या ठेव
योजनेच्या माध्यमातून ठेव ४८८५ खातेदारांकडुन रक्कम रु. १३ कोटी ९४ लाखाहुन अधिक ठेव रक्कम जमा
आहे अशा पदधतीने आर्थिक घटकांवर बचतीचे संस्कार घडविण्याचे काम संस्थेने केले आहे. सन २०२१-२०२२ मध्ये उत्कृष्ट कामकाज केलेल्या सहकारी पतसंस्था म्हणून बँको पतसंस्था ब्ल्यूरिबनने सन्मानित केले आहे व सकाळ गृप वतीने आयडॉल ऑफ महाराष्ट्र या अंतर्गत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांना वूमन इन्फल्यूएन्सर हा पुरस्कार देण्यात आला. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी संस्था आदर्शवत कामकाज करत आहे. या वर्षी संस्थेचा १००० कोटीचा आनंद मेळावा व वर्धापनदिन कार्यक्रमावेळी मा. श्री. अनिल कवडे साहेब, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच सहकारातील अनेक आजी माजी अधिकारी यांची उपस्थित होते. संस्था नियोजित कामकाज पूर्ण करताना विविध उपक्रम घेत असते अशाच प्रकारे पूढील वर्षाचे नियोजन करताना सन २०२२-२३ चा संकल्पपुर्ती आनंद मेळावा व या आर्थिक वर्षातील पहिला ग्राहक मेळावा आयोजनाचे ठरविलेले आहे. सदर मेळाव्याला व्हिजन २०२४ चे संकल्पचित्राचे अनावरण करणेत येणार आहे तरी सर्व सभासद, ग्राहक व समन्वयक यांनी सदर मेळाव्याला
उपस्थित राहावे असे आवाहन करणेत येत आहे.

फोटो : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि.चिपळूणचे संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाषराव चव्हाण संचालक सौ.स्मिताताई चव्हाण यांचे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि.चिपळूणचे आर्थिक वर्ष २०२२-२३ ची सर्व उद्दिष्ट पूर्ण झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना सीईओ सौ.स्वप्ना प्रशांत यादव आणि सर्व संचालक छायाचित्रात दिसत आहेत( छाया : ओंकार रेळेकर) दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!