लांजा : तालुक्यातील वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्र हे मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे हे महत्वाचे आहे दिवसा रात्री या ठिकाणी रुग्णांची मोठ्या प्रमाणात ये जा असते .हा भाग चिरेखाणीचा असल्यामुळे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव करीत आहे परंतु डॉक्टर उपस्थित राहत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असते , रविवारी रात्री 12 वाजता चिरेखाणीवर काम करणाऱ्या महिलेला डॉक्टर नसल्यामुळे गैरसोय झाली त्यामुळे भारतीय सत्यशोधक संघाच्या कार्यकर्त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठुन खाण कामगार महिलेची विचारपूस करून 108 रुग्णवाहिका तात्काळ बोलवून जिल्हा आरोग्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
या पूर्वीही वाडीलिंबू प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोगस कारभार चव्हाट्यावर आला होता त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु पुन्हा एकदा कर्मचारी सुस्तावले आहे त्यामुळे अशा डॉक्टरांवरी काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे. भारतीय सत्यशोधक संघाच्या अध्यक्षांनी जर अशीच आरोग्य व्यवस्था चालू राहणार असेल तर आम्हाला ही या संदर्भात ठोस पावले उचलावी लागतील असा संताप व्यक्त केला आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारला दखल न्यूज महाराष्ट्र
